
Summer Excessive Water Drinking: मानवी शरीराला अन्न आणि पाण्याची मूलभूत गरज असते. मात्र ठरावीक क्षमतेपेक्षा शरीरात कमी पाणी असेल, तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी आवश्यक असते. डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे अत्यावश्यक आहे. पण, पाणी पिण्याचे प्रमाण हे प्रत्येकाच्या गरजेनुसार असते. असेही तज्ज्ञ सांगतात.
शरीराची उष्णता बाहेर टाकण्यासाठी, पोषक द्रव्य व ऑक्सिजन शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचविणे, मूत्र आणि मलाद्वारे शरीरातून कचरा आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी आवश्यक आहे. सांधे आणि डोळे यासारख्या संयुक्त उर्तीना मज्जासंस्थेचे योग्य कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक असते.