

sakal
Can Hot Weather Trigger Heart Attacks: उन्हाळ्यात तापमानाचा पारा सतत वाढत असतो. मात्र त्याचा परिणाम फक्त त्वचा किंवा शरीराच्या थकव्यावरच होत नाही, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, प्रचंड उष्णतेमुळे शरीराला तापमान संतुलित ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते आणि याच काळात हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. विशेषतः ज्यांना आधीपासून हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी या दिवसांत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.