International Men's Day : पुरुषांसाठी हे सुपरफूड आहेत वरदान

आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिला असो वा पुरुष दोघांनीही आहारात काही विशेष पोषक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे.
Men's  Day
Men's DaySakal

Superfoods For Men : आज जागतिक पुरुष दिन साजरा केला जात आहे. ज्याप्रमाणे महिला निरोगी आरोग्यासाठी काळजी घेतात. त्याप्रमाणे पुरूषांचे आरोग्यही निरोगी राहणे गरजचे आहे.

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

Men's  Day
World Toilet Day 2022 : ​इंडियन की वेस्टर्न टॉयलेट? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं आहे बेस्ट

आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिला असो वा पुरुष दोघांनीही आहारात काही विशेष पोषक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. आज पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर, हृदय रोग, हाय कोलेस्ट्रॉल, शुगर, रक्तदाब आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आजार टाळण्यासाठी आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पुरुषांसाठी सुपरफूड असणाऱ्या पदार्थांबदद्ल सांगणार आहोत.

बदाम
बदाम

बदाम हे त्वचा, पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुपरफूड आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई आणि प्रथिनेदेखील असतात. आहारात याचा समावेश तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता.

Men's  Day
International Men's' Day : 'हे' आहेत जगातील सर्वात पावरफूल व्यक्ती
 पालक
पालक

पालक कॅल्शियम, फायबर आणि कॅरोटीनने परिपूर्ण आहे. रोगप्रतिकारक शक्तीसाठीही पालक खूप फायदेशीर आहे. पालक खाल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यासहीम मदत होते. पालकामध्ये फोलेटदेखील असते, जे पुरुषांच्या लैंगिक क्षमतेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

Men's  Day
International Men's Day 2022 : इथे पुरुषांना मिळतो न्याय; पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांची संघटना

ब्रोकोलीमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे रोगप्रतिकारक आणि रक्ताभिसरण प्रणालींना मदतगार ठरते. ब्रोकली तुम्ही सेलेब्सप्रमाणे हिरव्या भाज्यांमध्ये मिसळूनही खाऊ शकता.

Men's  Day
World Toilet Day 2022: दिवसातून कितीदा टॉयलेटला जावे?

हेल्थ फ्रिक व्यक्ती त्यांच्या आहारात ओट्सचा न विसरता समावेश करतात. उच्च रक्तदाब, वजन वाढणे आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हे उत्कृष्ट आहे. तसेच रोजच्या आहारात फायबर समाविष्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. हे सेवनामुळे पुरुषांच्या लैंगिक क्षमतेसाठीही फायदेशीर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com