स्वाभिमान, अभिमान व अहंकार : संत एकनाथ महाराज

स्वाभिमान, अभिमान व अहंकारातील सूक्ष्म फरक संत एकनाथांच्या विचारांतून; मानाचा पात्रतेशी, स्वाभिमानाचा तत्त्वांशी, अभिमानाचा अवस्थेशी व अहंकाराचा अतिरेकाशी असलेला संबंध उलगडला
Psychological Framework: Differentiating the Virtues of Swabhimaan from the Perils of Abhimaan

Psychological Framework: Differentiating the Virtues of Swabhimaan from the Perils of Abhimaan

sakal
Updated on

योगिराज महाराज पैठणकर

अभिमान व स्वाभिमान या दोन्ही शब्दांत मान हा शब्द सामायिक आहे. स्वाभिमान हा शब्द स्वतःच्या तत्त्वांविषयी ठाम राहण्याच्या भूमिकेशी संबंधित असतो व त्यात इतरांचाही आदर राखण्याची वृत्ती सामावलेली असते. तर अभिमान हा शब्द स्वतःच्या गुण-कर्म व अवस्थेशी संबंधित असून, माझ्याव्यतिरिक्त येथे कोणीही मोठे नाही अशी इतरांविषयी कनिष्ठतेची भावना त्यात असते. स्वाभिमान कायमस्वरूपी स्थिर असून, अभिमानाची व्याप्ती ही कालमान परिस्थितीनुसार बदलत जाते. प्रत्येक मनुष्य स्वाभिमानी असेलच असे नाही, परंतु मनुष्याला कशाचा तरी अभिमान असतोच. अभिमान हा कदाचित चांगलाही असू शकतो, अर्थात तो देश, धर्म, परंपरा, यश आदी गोष्टींशी सकारात्मकतेने युक्त असेल तर. परंतु तसे नसल्यास अभिमान हा घातकच होय. एकनाथ महाराज म्हणतात-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com