Swasthyam 2022 : ‘संगीतातील शक्ती शास्त्रीयदृष्ट्याही सिद्ध’

भारतीय संस्कृतीत अतिशय विलक्षण प्रथा आणि परंपरा आहेत. यातील सर्वोत्तम व आमच्या मनाच्या जवळचा असा खजिना म्हणजे संगीत.
Ruhani Sisters
Ruhani SistersSakal
Summary

भारतीय संस्कृतीत अतिशय विलक्षण प्रथा आणि परंपरा आहेत. यातील सर्वोत्तम व आमच्या मनाच्या जवळचा असा खजिना म्हणजे संगीत.

- रुहानी सिस्टर्स, सूफी गायिका

भारतीय संस्कृतीत अतिशय विलक्षण प्रथा आणि परंपरा आहेत. यातील सर्वोत्तम व आमच्या मनाच्या जवळचा असा खजिना म्हणजे संगीत. शास्त्रांतदेखील सोळा कलांमध्ये संगीताला सर्वोत्तम श्रेणीत गणले गेले आहे. संगीत हा ईश्वरभक्तीचा उत्तम मार्ग आहे. संगीतातील रागांमधील शक्ती आता शास्त्रीयदृष्ट्यादेखील सिद्ध झाले आहे.

आपल्या प्रत्येकाचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर, जीवनशैलीवर आणि आपल्या श्रद्धा व विश्वासावर अवलंबून असते. मानसिक आरोग्यातील चढउतार आपल्या दैनंदिन शारीरिक सवयींवर परिणाम करते. त्यामुळे मानसिक आरोग्य सुदृढ असेल, तरच सुदृढ शारीरिक आरोग्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. बहुतांश वेळा मानसिक आरोग्यातील चढउतार किंवा त्यातील अडचणी आपल्याला लक्षात येत नाहीत, किंवा लक्षात आल्यास त्यावर काय उपाय करावे, हे कळत नाही. परंतु, काही प्रमाणात आता याबाबत जागरुकता वाढू लागली आहे.

भारतीय कलाप्रकारांचे सामर्थ्य

मानसिक आरोग्य हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे, हे आता सगळ्यांनाच लक्षात आले आहे. जगभरातील अनेक व्यक्ती मानसिक स्वास्थ्यासाठी आता अभिजात भारतीय कलाप्रकारांकडे वळत आहेत. भारतीय संगीत, नृत्य, योगा अशा सगळ्या प्रकारांचा यात समावेश आहे. आनंदाची बाब म्हणजे अनेक पालक आपल्या मुलांनाही यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. अधिकाधिक लोकांपर्यंत याचे महत्त्व पोचण्यासाठी आता कलाकारांनी पुढे येण्याची गरज आहे.

भारतीय संस्कृतीतील खजिना

भारतीय संस्कृतीत अतिशय विलक्षण प्रथा आणि परंपरा आहेत. ‘योग’ हा सर्वांत मोठा खजिना आपल्या संस्कृतीत आहे. सर्व प्रकारच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेणारा हा मार्ग आहे. ‘नृत्यसाधना’ हा अजून एक खजिना आपल्या संस्कृतीत आहे. कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी यांसारखे भारतीय नृत्यप्रकार शरीराला सर्वांगीण व्यायाम देण्यात आणि मानसिक समाधान मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. भारतीय रंगभूमीचाही समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे. नाटकाच्या माध्यमातून स्वतःविषयी जागरूकता वाढवणे, उत्तम प्रकारे आपल्या भावना व्यक्त करणे, आदींबाबत मदत होऊ शकते आणि अर्थातच, यातील सर्वोत्तम व आमच्या मनाच्या जवळचा असा खजिना म्हणजे संगीत. शास्त्रांतदेखील सोळा कलांमध्ये संगीताला सर्वोत्तम श्रेणीत गणले गेले आहे. संगीत हा ईश्वरभक्तीचा उत्तम मार्ग आहे. संगीतातील रागांमधील शक्ती आता शास्त्रीयदृष्ट्यादेखील सिद्ध झाले आहे.

योगाचे अनन्यसाधारण महत्त्व

योगाची लोकप्रियता आणि त्याविषयीची जागरूकता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढते आहे. संपूर्ण जगभरात आता योगा पोचतो आहे. खरेतर, योगाची देणगी भारतीय संस्कृतीचीच; पण आपल्यालाच योगाचे महत्त्व कळले नाही आणि आपण योगाला आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून स्वीकारले नाही. आम्हीदेखील काही वर्षांपासून दिनचर्येत योगाचा स्वीकार केला आहे. ज्याप्रमाणे गळ्याच्या स्वास्थ्यासाठी रियाजावर माझा पूर्ण विश्वास आहे, तसाच शारीरिक सुदृढतेसाठी योगावर माझा संपूर्ण विश्वास आहे. योगाचा सराव हा प्रत्येकाला अगदी सहजसाध्य आहे. नियमित योगा करणाऱ्या व्यक्तींना ताणतणावाचे व्यवस्थापन करणे सोपे जाते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. अनेक अभ्यासांद्वारेही हे सिद्ध झाले आहे.

सादरीकरणासाठी उत्सुक

महाराष्ट्राकडे अतिशय समृद्ध संगीताची परंपरा आहे. पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोरी आमोणकर, डॉ. प्रभा अत्रे अशा दिग्गज गायकांची परंपरा या भूमीला लाभली आहे. अशा ठिकाणी सादरीकरण करायला मिळणे, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. ज्या संगीतातून आम्हाला आनंद मिळतो, समाधान मिळते, तेच रसिकांसमोर सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

(शब्दांकन : महिमा ठोंबरे)

प्रवेशिका या ठिकाणी उपलब्ध?

काही कार्यक्रम निमंत्रितांसाठी राखीव. प्रत्येक कार्यक्रमासाठी

स्वतंत्र प्रवेशिका आहेत. मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध.

वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत

१. पंडित फार्मस् : गेट नं. २, डी. पी. रोड , कर्वेनगर, पुणे. SIILC : सकाळनगर, बेसमेंट बाणेर रोड , पुणे.

२. सीझन्स मॉल : बाटा शोरूम समोरील प्रवेशद्वार, हडपसर, पुणे. सकाळ हेड ऑफिस : ग्राउंड फ्लोअर, बुधवार पेठ, पुणे.

३. सकाळ पिंपरी ऑफिस : बी-झोन बिल्डिंग पाचवा मजला , एम्पायर इस्टेट शेजारी, पिंपरी

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

https://www.globalswasthyam.com/

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com