Swasthyam 2023 : सस्टेनेबल अँड नॉन सस्टेनेबल डाएट; हा काय प्रकार आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam 2023

Swasthyam 2023 : सस्टेनेबल अँड नॉन सस्टेनेबल डाएट; हा काय प्रकार आहे?

Swasthyam 2023 : डाएटचे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील. किटो डाएट, लो कॅलरी डाएट. पण तुम्ही सस्टेनेबल आणि नॉन सस्टेनेबल डाएटबाबत कधी ऐकलंत का? हे प्रकार तुम्हाला कळल्यास डाएटच्या बाबतीत ज्या चुका तुम्ही दैनंदिन जीवनात करत असता त्या परत कधी करणार नाही.

सकाळ समुहाने गेल्या महिन्यात आरोग्याबाबत वाचकांचे ज्ञान आणखी वाढवण्याच्या हेतूने स्वास्थ्यम हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नुपूर पाटील या डायटिशीयनचं डाएटबाबत माहिती सांगणारं सेशन घेण्यात आलं होतं. या सेशनच्या माध्यमातून लोकांचे डाएटबाबतचे बरेच गैरसमज दूर झालेत. (Diet)

नुपूरने सांगितलेला सस्टेनेबल आणि नॉन सस्टेनेबल डाएट हा नेमका काय प्रकार आहे ते आपण जाणून घेऊयात.

सस्टेनेबल डाएट म्हणजे काय?

रोजच्या जेवणात जसे आपल्या आवडीचे आणि आपल्या घरात उपलब्ध असणारे पदार्थ असतात. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या डाएटमध्येसुद्धा तुम्हाला परवडणारे आणि सहज उपलब्ध असणारे पदार्थ असावे. जेणेकरून तुम्हाला दीर्घकाळासाठी हा डाएट फॉलो करता येईल. नाहीतर ब्रॉकली तुम्ही एक दिवस खाल आणि महाग आहे म्हणून ती स्किप कराल तर त्या डाएटचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. (Health)

तुमचा डाएट सस्टेनेबल असेल तरच तुमच्यात बदल दिसून येईल. अन्यथा तुमच्या डाएटला काहीही अर्थ उरणार नाही.

हेही वाचा: Swashtyam 2022 : रितेश जेनेलियाकडून घ्या आरोग्याचे धडे

नॉन सस्टेनेबल डाएट

एखाद्या डायटिशीयनने सांगितले म्हणून किंवा एखादी अभिनेत्री फॉलो करतेय म्हणून तुम्हाला आवडत नसलेल्या परवडत नसलेल्या गोष्टी खात डाएट फॉलो करणे म्हणजे एक प्रकारे नॉन सस्टेनेबल डाएट असं म्हणता येईल. हा डाएट तात्पुरता असतो. हा डाएट तुम्ही दीर्घकाळ फॉलो करू शकत नाही.

उदा. डाएटचा कंटाळा आला म्हणून काहीतरी हाय कॅलरीजचा पदार्थ खाणे

डाएट काही कारणाने अधेमधे सोडणे

हा प्रकार नॉन सस्टेनेबल डाएटचा आहे असं म्हणता येईल.