Heat Stroke : उष्माघात रोखण्यासाठी अशी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी

Heat Stroke : उष्माघात गंभीर बाब आहे. शरीराचे तापमान जेव्हा १०६ डिग्री सेल्सिअस १५ मिनिटांकरिता राहते. तेव्हा शरीरावर परिणाम होतात.
Heat Stroke
Heat Strokeesakal
Updated on

Heat Stroke : हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सलग तीन दिवस कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्शियसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट म्हणतात. सलग दोन दिवस तापमान ४५ अंशावर असल्यास उष्णतेची लाट आली आहे, असे समजावे. यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी हीट ऍक्शन प्लॅन आखण्यात येतो.

उष्माघात गंभीर बाब आहे. शरीराचे तापमान जेव्हा १०६ डिग्री सेल्सिअस १५ मिनिटांकरिता राहते. तेव्हा शरीरावर परिणाम होतात. शरीराची तापमान नियंत्रण यंत्रणा काम करीत नाही. प्रथिने उष्णतेमुळे खराब होतात.

विविध प्रकारचे लायपो प्रोटिन्स आणि फॉस्पोलिपिडस अस्थिर होतात. शरीरातील मेद पदार्थ वितळतात. यामुळे रक्ताभिसरण संस्था अकार्यक्षम होते. अवयवांचे कार्य ठप्प होऊ लागते. वेळेवर तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास मृत्यूची शक्यता असते.

Heat Stroke
Heat Stroke Home Remedies :  उष्माघाताचा त्रास सुरू झाल्यास रूग्णाला सर्वात आधी द्या या गोष्टी!

उष्णतेमुळे होणारा त्रास

  • उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटतात

  • हातापायाला गोळे व चक्कर येते

  • तापमान १०६ वर गेल्यास मृत्यूची शक्यता

बचाव करण्यासाठी हे करा...

  • पुरेसे पाणी प्यावे. पाणी सोबत ठेवावे.

  • हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरावे.

  • उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरावा.

  • उन्हात टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवावे.

  • पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवावे.

  • कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी.

  • ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे करू नका…

  • शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.

  • पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

  • गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका.

  • उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा.

  • स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.

  • मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.

उष्णतेचा त्रास कुणाला होतो ?

  • उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक

  • वृध्द आणि लहान मुले

  • स्थूल लोक, अयोग्य कपडे घालणारे,

  • पुरेशी झोप न झाल्यास

  • गर्भवती महिला

  • अनियंत्रित मधुमेह

  • हृदयरोग असणारे

  • अपस्मार रुग्ण

  • दारुचे व्यसन असणारे

  • काही विशिष्ट औषधे घेणारे

  • निराश्रित, बेघर नागरिक

बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणी, बॅंका, पेट्रोल पंप, मुख्य रस्ते आदी ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. उन्हात लोकांना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करण्यासोबतच बागा, धार्मिक ठिकाणे, धर्मशाळा दिवसभर खुल्या ठेवण्यात येतात. कार्यालये, शाळा महाविद्यालये यांच्या कामाच्या वेळा बदलण्याची गरज आहे, हे लोकप्रबोधनाचे विषय हीट ॲक्शन प्लॅनअंतर्गत राबवावे लागतात.

- डॉ. प्रदीप आवटे, सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर.

Heat Stroke
Home Remedies For Dehydration : डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी 'या' घरगुती उपायांची घ्या मदत, पाण्याची कमतरता होईल दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com