Health Tips
Health Tipssakal

Health Tips: हे Vitamin शरीरासाठी गरजेचं मात्र त्याचं अती प्रमाणात सेवन ठरु शकतं हानीकारक

आपल्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वे किती महत्वाची आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे.
Published on

जीवनसत्त्वे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची आहेत हे आपल्या सर्वांना चांगलंच माहित आहे. केस आणि त्वचेसाठी व्हिटॅमिन एच चांगले मानले जाते. व्हिटॅमिन एच हे बायोटिन म्हणून देखील ओळखले जाते.

हे पाण्यात सहज विरघळते. चर्बी, कार्बोहायड्रेट आणि प्रथिने चयापचय करण्यास देखील हे मदत करते. तसेच कधीकधी मधुमेहाच्या रूग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

जर तुम्ही योग्य माहितीसह हे सर्व व्हिटॅमिन घेत असाल तर ते सुरक्षित मानले जाते, परंतु उच्च डोसमुळे तुमच्या त्वचेवर पुरळ, मुरुम आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल यासारखे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया याचे सेवन करण्याची योग्य पद्धत.

Health Tips
Summer Drink: साधं नारळपाणी पिऊन कंटाळलात मग हे स्पेशल हेल्दी ड्रिंक नक्की ट्राय करा

Vitamin H

  • त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास व्हिटॅमिन एच मदत करते. तसेच हे नखांसाठी देखील आवश्यक आहे.

  • अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास देखील व्हिटॅमिन एच मदत करते. महत्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी करण्यासाठीही याचा वापर केला जातो.

  • व्हिटॅमिन एच हे गर्भाच्या विकासासाठी गर्भवती महिलांसाठी देखील आवश्यक आहे. पण महिलांनी त्याचा वापर सावधगिरीने केला पाहिजे.

Health Tips
Dragon Fruit For Health: निरोगी रहायचं आहे? मग रोज जेवणानंतर खा हे फळ...

Vitamin H चे तोटे

Vitamin H व्यवस्थित घेत असाल तर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, पण तुम्ही ते जास्त घेतल्याने काय नुकसान होऊ शकते, ते जाणून घ्या…

  • त्वचेवर पुरळ किंवा मुरुम येणे

  • अस्वस्थ पोट

  • मळमळ होणे

  • अतिसार होणे

  • केस गळणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com