

Thane to Launch Air Ambulance
sakal
नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवर हेलिपॅड तयार केले आहे. रुग्णालय प्रशासनाने एअर अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यासाठी ही तयारी सुरू केली आहे. राज्य सरकार किंवा उद्योगांच्या सामाजिक दायित्वातून ही अॅम्बुलन्स उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू असून दुर्घटना किंवा गंभीर रुग्णांसाठी ही अॅम्बुलन्स वरदान ठरणार आहे. ही सेवा सुरू झाल्यास हा जिल्हा सामान्य रुग्णालयातील देशभरातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. तसेच एअर अॅम्बुलन्ससाठी प्रथमच इमारतीवर हेलिपॅड तयार करण्यात आला आहे, असा दावाही जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.