gold
sakal
‘जुने ते सोने’ अशी एक म्हण आहे. त्यावर पुष्कळ लोक टीकाही करतात. जुनी व पुरातन प्रत्येक गोष्ट चांगली असते असे नाही व तिला सोन्याएवढी किंमत देण्यासारखेही नाही; परंतु अशी टीका करणाऱ्यांना ही म्हण खऱ्या अर्थाने कळलीच नाही असे म्हणावे लागेल. वर्तमान काळात ताजा भाजीपाला, फळे, फुले यांचे सौंदर्य काही औरच असते.