कोरोनाला रोखायचे असेल तर 'काढा' सोडा अन्‌ 'एसएमएस'च पाळा!

कोरोनाला रोखायचे असेल तर 'काढा' सोडा अन्‌ 'एसएमएस'च पाळा!
Mask
MaskSakal
Summary

कोरोना महामारीनंतर पूर्वपदावर आलेले जनजीवन व अर्थव्यवस्था पुन्हा एकदा तिसरी लाट / ओमिक्रॉनच्या सावटाखाली येऊ लागली आहे.

सोलापूर : कोरोना (Covid-19) महामारीनंतर पूर्वपदावर आलेले जनजीवन व अर्थव्यवस्था पुन्हा एकदा तिसरी लाट / ओमिक्रॉनच्या (Omicron) सावटाखाली येऊ लागली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरलेला मालेगाव काढा (Malegaon Kadha) असो की त्या-त्या भागात तयार केलेले काढा मधल्या काळात बंद झाला होता. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी तुमच्या डोक्‍यात काढ्याचा विचार असेल तर तो आताच सोडा. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स (Social Distance), मास्क (Mask) आणि सॅनिटायझर (Sanitizer) (एसएमएस) हाच जुना फॉर्म्यूला प्रभावी ठरेल, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (The formula of SMS will be effective in preventing the spread of Corona)

Mask
Covid 19 : तिसरी लाट रोखण्यासाठी 12 हजार कोटींचा निधी!

आले (Ginger), लवंग (Cloves), गुळवेल (Mulberry), हळद (Turmeric), मुसळी, तुळशीची पाने (Tulsi Leaves), दालचिनी, काळी मिरी, मध, इलायची, काळे मीठ, ज्येष्ठमध यासह अनेक माहिती नसलेली आयुर्वेदातील (Ayurveda) नावे कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत सर्वसामान्यांना समजली. कोरोनाला रोखण्यासाठी रोज दोन ते तीन टाईम काढा पिण्याची जणू काहीजणांना सवयच जडली होती. काढ्यामुळे नंतरच्या काळात उष्णता वाढणे, घशाचा त्रास, मूळव्याध यासह इतर व्याधी काहीजणांना उद्‌भवल्या असल्याचेही समोर आले होते. दिवसभरात काढा आणि मटण (Meat), चिकन (Chicken), अंड्यांवर (Egg) अनेकांनी ताव मारला होता. ओमिक्रॉनचा वेग भयंकर असल्याने बाधा झाल्यानंतर हे सर्व करण्यास कमी कालावधी मिळण्याची शक्‍यता आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने मास्कचा नियमित वापर, गर्दीत जाणे टाळणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली होती, तीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत / ओमिक्रॉनच्या संकटात उपयुक्त ठरणार असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मास्क वापराचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांवर आल्याचे दिसते. सॅनिटायझर वापराचा व सोशल डिस्टन्सिंगचाही अनेकांना विसर पडला असल्याचे सध्या दिसत आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातही कमी प्रमाणात वाढ दिसू लागली आहे. उपचारासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे. पहिल्या दोन लाटांपेक्षा या लाटेचा वेग अधिक आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि कोरोना लसीकरण याशिवाय सध्या तरी ठोस पर्याय दिसत नाहीत.

- डॉ. शीतलकुमार जाधव (Dr. Shitalkumar Jadhav), जिल्हा आरोग्य अधिकारी

Mask
महाविकास आघाडीचे 'असे' असेल जागावाटप! भाजपला रोखण्यासाठी तयारी

महत्त्वाच्या टिप्स...

  • तातडीने कोरोना लसीकरण करून घ्या

  • मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजाराच्या रुग्णांनी त्यांचे आजार नियंत्राणात ठेवावेत

  • आहार, व्यायाम या माध्यमातून रोगप्रतिकारकशक्ती बळकट होण्यासाठी विशेष लक्ष द्या

  • सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असल्यास तातडीने निदान करा, उपचार घ्या

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्‍यतो टाळा, सोशल डिस्टन्सिंग प्रकर्षाने पाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com