कोरोनासाठी Herd Immunity चा विचार मुर्खपणाचा; WHO च्या वैज्ञानिकांचा दावा

The idea of Herd Immunity for Corona is silly WHO scientists claim
The idea of Herd Immunity for Corona is silly WHO scientists claim

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी नैसर्गिक संक्रमण माध्यमातून हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) प्राप्त करण्याचा विचार मुर्खपणाचा आहे कारण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामीनाथन एनडीटीवीसोबत संवाद साधताना दिली.

नवीन ओमीक्रॉनचा सब-व्हेरिअंट(Omicron) बाबत त्या म्हणाल्या की, ''BA.2, BA.1 ची तुलना अधिक शक्तीशाली आहे आणि त्याचे संक्रमण इतर व्हेरिअंटपेक्षा वेगाने होतोकाही देशांमध्ये विशेषत: भारत(India) आणि डेनमार्कमध्ये(Denmark) हा व्हायरस पसरत आहे. '' (The idea of Herd Immunity for Corona is silly WHO scientists claim)

The idea of Herd Immunity for Corona is silly WHO scientists claim
जास्त व्यायाम न करता पोटाची चरबी होईल कमी, 3 सोप्या पध्दती करा फॉलो

डॉस्वामीनाथन यांनी सांगितले की, ''जागतिक आरोग्य संघटना अद्याप ओमिक्रॉनच्या परिणामांवर भाष्य करू शकत नाही कारण ही तुलनेने नवा व्हेरिअंट आहे आणि यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो की नाही आणि दीर्घकालीन प्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होईल की नाही, हे निर्धारित करण्यासाठी अभ्यास चालू आहेत.

त्या म्हणाले, "त्यामुळे पुन्हा संसर्ग होतो का आणि त्याचा दीर्घकालीन प्रतिकारशक्तीवर कसा परिणाम होतो हे शोधण्यासाठी दोन महिने खूप कमी वेळ आहे. आम्ही काही अभ्यासांमध्ये पाहिले आहे की, नवीन व्हेरिअंट संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तामधील रक्तामध्ये डेल्टा संसर्ग मदत करतो. पण भविष्यातील व्हेरिअंटसाठी हे योग्य ठरेल की नाही हे सांगू शकत नाही.''

The idea of Herd Immunity for Corona is silly WHO scientists claim
धुम्रपान सोडल्यानंतर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

कोविड विरूद्धच्या सध्याच्या लस ओमिक्रॉनवर कशाप्रकारे काम करत आहे याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की.''प्रयोगशाळेच्या स्तरावरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अँटीबॉडीज डेल्टा व्हेरिअंटपासूनही नवीन व्हेरिअंट परिणामशून्य करण्याची शक्यता कमी आहे. डेल्टा संक्रमणापेक्षा कमी, जे आधीपासूनच लसीवर पुर्वीच्या व्हेरिअंटच्या तुलनेते कमी प्रतिक्रियाशील होते. पण चांगली बातमी अशी आहे की, क्लिनिकल डेटा दर्शवितो की, लसीकरणाच्या रूग्णांमध्ये मृत्यूची आणि गंभीर आजाराची कमी प्रकरणे आहेत. ते म्हणाले की, ''सध्याच्या लसींनी ओमिक्रॉन स्ट्रेनवर काम केले आहे की नाही याबद्दल काळजी करण्याची गरज नाही.''

त्या म्हणाले, "हायब्रिड इम्युनिटी ही या क्षणी आपल्याकडे असलेली सर्वात मजबूत इम्युनिटी आहे. जेव्हा एखाद्याला ओमिक्रॉनचा संसर्ग होतो आणि त्याला लसीचा डोस मिळाला की हायब्रिड होतो."आता आणखी म्युटेशन होतील का? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, ''हा आरएनए विषाणू आहे आणि त्यात उत्परिवर्तन होणे स्वाभाविक आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com