धुम्रपान सोडल्यानंतर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

तुम्हाला धुम्रपान सोडायचे आहे पण, सोडल्यानंतर दिसणाऱ्या लक्षणांबाबत काळजी वाटतेय? वाचा संपूर्ण बातमी
What happens after you quit smoking?
What happens after you quit smoking?

धुम्रापान आरोग्यासाठी नुकासानदायक आहे हे प्रत्येकाला माहित आहे पण तरीही २०१६-२०१७ दरम्यान, भारतामध्ये केल्या जाणाऱ्या जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार (Global Adult Tobacco Survey), जवळपास २० टक्के भारतीय पुरुष आणि २ टक्के भारतीय महिला धुम्रपान करतात.

पण धुम्रपानामुळे मृत्यू नंतर होतो पण त्याआधीच तंबाकू आणि सिगारेटची सवय लागते आणि कित्येक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्वेक्षणानुसार, ९२ टक्के प्रौढांना हे माहित असते की धुम्रपानामुळे कित्येक गंभीर आजार होऊ शकतात.

सर्वेक्षणामधून हे देखील समोर आले की, धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ५५ टक्के धुम्रपान सोडण्यांचा (quit smoking) विचार करतात पण ते त्यामध्ये अयशस्वी ठरतात. जे लोक प्रयत्न करत होते त्यांपैकी अर्धे लोक एक महिना देखील हे प्रयत्न पूर्ण करू शकले नाही आणि पुन्हा धुम्रपान करण्यासाठी तयार होतात.

What happens after you quit smoking?
What happens after you quit smoking?
What happens after you quit smoking?
Mental Health : पुरुषही रडू शकतो, त्यालाही असते मानसिक आधाराची गरज!

धुम्रपान सोडणे वाटते तितके सोपे नाही

तुम्ही विचार केला की, ''आता धुम्रपान नाही करायचे आणि धुम्रपानाची सवय सुटली'' इतके सोपे नाही. धुम्रपान सोडण्यासाठी (quit smoking) तुम्हाला आपल्या परिवार, सहकारी, सहाय्यता गट, आणि सल्लागारांची सोबतच डॉक्टरांकडून वेळेवर वैद्यकीय उपचार करणे देखील आवश्यक आहे.

तुम्ही धूम्रपान सोडल्यानंतर तुम्हाला पुन्हा धूम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आणि/किंवा औषधे देखील आवश्यक आहेत.

What happens after you quit smoking?
लव बाईटमुळे प्रेमच नव्हे, आरोग्याच्या समस्याही वाढतात, 'अशी' घ्या काळजी
What happens after you quit smoking?
What happens after you quit smoking?

तुम्हाला धुम्रपान विड्रॉल सिम्‍प्‍टम्‍स (Smoking withdrawal symptoms)आधी समजून घ्यावी लागेल

धुम्रपान शरीराच्या कित्येक अवयवांना प्रभावित करते, ज्यामध्ये ह्रद्य, हार्मोन, पचनक्रिया आणि मेंदू यांचा समावेश होतो. त्यामुळे धुम्रपान सोडल्यानंतर शरीरावर त्याचा प्रभाव पडण्यास सुरूवात होते आणि लक्षण दिसू लागतात.

विड्रॉल सिम्‍प्‍टम्‍सची काळ आणि तीव्रतेवर या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्ही किती काळापासून धुम्रपान करत आहात आणि एका दिवसामध्ये किती सिगारेट ओढत होता. साधारणपण धुम्रपानाकडे पुन्हा वळण्याची ५ ते ६ आठवडे दिसतात.

शारीरिक लक्षण : यामध्ये भूक, क्रेविंग, थकवा, डोकेदुखी, खोकला आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

What happens after you quit smoking?
What happens after you quit smoking?

धुम्रपान करताना जे रसायने भूक कमी करतात ते धुम्रपान सोडल्यानंतर भूक वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात त्यामुळए धुम्रपान सोडल्यानंतर लोत जास्त अन्न आणि वजन वाढण्यासाठी तक्रार करतात. अखेर, हे लक्षण काही दिवसांनी किंवा आठवड्यांनी गायब होते.

पण, नकोटीनसाठी वारंवार होणारी इच्छा( क्रेविंग) नियंत्रित करणे सर्वात अवघड असते. हे टप्प्याटप्प्याने दिसून येते आणि धूम्रपान सोडल्यानंतर पहिल्या तासात हे लक्षण दिसू शकते.. प्रत्येकवेळी ही क्रेविंग 15 ते 20 मिनिटे टिकते. तुम्ही गाणी ऐकून, व्हिडिओ पाहून आणि कामामध्ये गुंतवून किंवा आपल्या एखादा मित्र किंवा कुटुंबासोबत गप्पा मारून स्वत:ला व्यस्त ठेवू शकता. तेव्हा तुम्ही ही क्रेविंह निंयत्रित करू शकता.

डोकेदुखी आणि चक्कर येणे हे साधारण लक्षण असतात आणि थोडे प्रयत्न केल्यास निंयत्रित करता येऊ शकतात. दुसरीकडे बद्धकोष्ठतेचा खूप त्रास होतो. या प्रकारच्या समस्या आपल्याला बहूतेक सर्व फळ, भाज्या आणी संपूर्ण धन्याचे सेवन केले पाहिजे.

What happens after you quit smoking?
Better Mental Health : उत्तम मानसिक आरोग्यासाठी 'हे' पदार्थ खा

मानसिक आणि भावनात्मक लक्षणे

धूम्रपान तनावपासून सुटका देतो त्यामुळे धुम्रपान सोडल्यानंतर तनाव, चिंता वाढू शकता. सुरूवातीचे काही आठवडे हा ताण जास्त असू शकतो. तीन-चार आठवड्यांसाठी नैराश्यही येऊ शकते. जर हे लक्षण जास्त तीव्र असतील तर दिर्घकाळ त्रास होऊ शकतो अशावेळी डॉक्टरांची मदत घ्या.

छोट्या-मोठ्या गोष्टींवर खूप चिड-चिड होऊ शकते. स्वत:ला सर्व गोष्टींपासून दूर गेल्यासारखे वाटू शकते. पण तुम्ही लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्रास होऊ शकतो. या प्रकारची लक्षणे काही दिवस किंवा काही आठवडे दिसू शकतात.

What happens after you quit smoking?
What happens after you quit smoking?

विड्रॉल सिम्‍प्‍टम्‍सचे लक्षण तुम्हाला दिसू शकतात

30 मिनिट ते 4 तासांपर्यंत : पुन्हा सिगारेट पिण्याची तल्लफ होणे

10 तास : चिंता आणि नैराश्य

24 तास: चिडचिड होणे आणि भूक वाढणे

2 दिवस : निकोटीनच्या कमतरतेमुळे डोकं दुखू शकते.

3 दिवस : क्रेविंग संपल्यानंतर चिंता आणि नैराश्याची येऊ शकते.

1 आठवडा : सतत चिंता आणि क्रेविंग होणे. हे सावध राहण्याचा काळ असतो, जेव्हा तुम्हाला मद्यपान आणि धुम्रापान करणाऱ्या लोकांपासून दूर राहण्याची गरज असते.

4 आठवडे: कमी उर्जा, चिंता आणि नैराश्यामध्ये सुधारणा, भूकेमध्ये बदल आणि कधी कधीतरी क्रेविंग होऊ शकते.

5 आठवडे : शरीरावर निकोटीनचा पडणारा प्रभाव साधारण संपून जातो. पुन्हा धुम्रपान करण्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला पुढील काही महिने मानसिकरित्या मजबूत राहायला हवे.

What happens after you quit smoking?
What happens after you quit smoking?
What happens after you quit smoking?
फक्त अंड-पनीर नव्हे, भरपूर Protein असलेल्या 'या' ४ डाळी खा

स्मोकिंग सोडण्याचे फायदे दिसण्यासाठी किती वेळ लागतो?

२० मिनिट : रक्तदाब आणि ह्रदयाची गती स्थिर होते. रक्ताभिसरणामध्ये सुधार येतो.

८ तास : रक्तामध्ये निकोटीन आणि कार्बन मोनोऑक्साईडचा स्तर अर्धा होऊ जातो. ऑक्सिजनची पातळी सामान्य असते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

12 तास: रक्तातील कार्बन मोनोऑक्साइडची पातळी सामान्य होते.

24 तास: कार्बन मोनोऑक्साइड आता शरीरातून पूर्णपणे नष्ट होते आणि खोकल्याद्वारे कचरा साफ केला जात आहे.

72 तास: फुफ्फुसे आता अधिक हवा पंप करू लागतात आणि श्वास घेणे सोपे होते.

1 ते 2 आठवडे: फुफ्फुसाचे कार्य आणि रक्ताभिसरण सुधारते

1 महिना: चांगले रक्ताभिसरण झाल्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि सुरकुत्या होत नाही

1 वर्ष: हृदयविकाराचा धोका धूम्रपान करणार्‍यांपेक्षा निम्म्याहून कमी असतो

15 वर्षे: हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका धूम्रपान न करणाऱ्यांना असतो.

होय, हे खरे आहे की धूम्रपान सोडणे सोपे नाही. पण तुमच्या आयुष्यातल्या या वाईट सवयीपासून सुटका मिळवायची असेल तर थोडा त्रास आणि अस्वस्थता सहन करायला हवी असं वाटत नाही का?

What happens after you quit smoking?
What happens after you quit smoking?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com