Life Cycle
sakal
माणसाच्या पायाला आणि त्याच्या मागे अनेक चक्रे लागलेलीच असतात. मनुष्य चक्रम असला तर त्याला सुदर्शन चक्र दाखवावे लागते आणि बुद्धिमान असला तर त्याला हैराण करणारे चक्रम काही कमी नसतात. विश्र्वचक्र अविरत चालणारे असून, ते आपल्याबरोबर माणसाला आत ओढून ढकलत ढकलत गरागरा फिरावयास लावणारे आहे, हे सर्वपरिचित आहे. एकूण या जगात राहायचे म्हणजे या चक्राबरोबर फिरत राहायचे.