
महेंद्र गोखले
शारीरिक व्यायाम योग्य वयात केला नाही, तर त्याचे दुष्परिणाम चाळिशीनंतर भोगावे लागतात. फिटनेसपासून आहारापर्यंत अनेक गोष्टींबाबतचे हे विवेचन आजपासून दर आठवड्याला.
काही आठवड्यांपूर्वी मी एका कॉर्पोरेट फिटनेस कार्यशाळेसाठी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये गेलो होतो. त्या कंपनीतल्या सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के कर्मचारी २५ ते ३५ वर्षे वयोगटातील होते. त्यांच्याशी संवाद साधल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा मला कळले, की ते कर्मचारी अशा प्रकारच्या फिटनेस कार्यशाळेत सहभागी होण्यास अजिबात इच्छुक नव्हते.