The Mantra for Staying Active and Productive
sakal
- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
माझ्या कॅन्सर प्रवासात मी कामाशी नातं कधीच तुटू दिलं नाही. शरीरावर उपचार सुरू होते, औषधांच्या दुष्परिणामांनी मन थकत होतं; पण तरीही मी काम सोडून दिलं नाही. कधी परिस्थितीची खरी गरज होती, तर कधी स्वतःला कामात गुंतवून ठेवणं माझ्यासाठी औषधापेक्षाही महत्त्वाचं ठरलं.