दीर्घायुष्याचा शोध कॅलरी नियमन

मानवजातीचा सर्वांत जुना शोध म्हणजे दीर्घ आणि निरोगी आयुष्य. प्राचीन भारतातील योगी उपवास, ध्यान आणि संयमातून दीर्घायुष्य साध्य करायचे म्हणत.
Science of Survival

Science of Survival

sakal

Updated on

डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ

‘मिताहारं व्रजेत् नित्यं, शीलं चोन्नतमन्वहम् ।

संयमाद् दीर्घमायुः स्यात्, रोगाणां च क्षयो भवेत् ॥’

(मिताहार आणि संयम पाळणाऱ्याचे आयुष्य दीर्घ होते,आणि त्याच्या शरीरात रोगांचा नाश होतो.)

मानवजातीचा सर्वांत जुना शोध म्हणजे दीर्घ आणि निरोगी आयुष्य. प्राचीन भारतातील योगी उपवास, ध्यान आणि संयमातून दीर्घायुष्य साध्य करायचे म्हणत; आणि आजचे वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये हाच संदेश परत सिद्ध करत आहेत - ‘कमी खा, नीट खा, आणि शांत राहा.’

अलीकडच्या विज्ञानात याला नाव दिले आहे - ‘कॅलरीक रिस्ट्रिक्शन’ (Caloric Restriction – CR) म्हणजेच पुरेशी पोषणमूल्ये राखून थोड्या प्रमाणात अन्नकॅलरी कमी घेणे. संशोधन सांगते, की हे केवळ वजन कमी करण्यासाठी नव्हे तर वृद्धत्वाचा वेग कमी करण्यासाठी, हृदयरोग व मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आणि आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com