
सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या शक्तीत, पाहणाऱ्याच्या डोळ्यात व पाहणाऱ्याच्या विचारात असते असे म्हणतात, पण सौंदर्याची व्याख्या करत असताना कुठेतरी सुरुवात करावीच लागले. व्यक्ती सुदृढ व आरोग्यवान असली तरच पुढे त्या व्यक्तीत असलेल्या गुणांमुळे किंवा पाहणाऱ्याच्या गरजेप्रमाणे सौंदर्याची व्याख्या ठरविली जात असावी. मी सुंदर नाही अशी उगीचच कोणी कल्पना करून घेऊन नये. प्रत्येक व्यक्ती जन्मतः सुंदरच असते आणि त्या व्यक्तीचा ज्या ठिकाणी संबंध जोडलेला असेल त्या साथीदाराला सौंदर्यं दिसत असते, आणि म्हणूनच संसारात सर्व प्रकारच्या जोड्या जमलेल्या दिसतात.