प्रश्न - तमीळमध्ये एक म्हण आहे - ‘सत्य बोलून कोणी स्वतःचा नाश केला नाही. असत्य बोलून कोणी चांगले जगू शकले नाही.’ हे खरे आहे का?
सद्गुरू - प्रथम, आपल्याला सत्य आणि असत्य यांची व्याख्या करावी लागेल. आपण फक्त तथ्ये सांगण्याच्या अर्थाने मौखिक सत्याबद्दल बोलत आहोत, की आपण जीवनाचे पोषण करणाऱ्या सत्याबद्दल बोलत आहोत? निश्चितपणे सत्य जीवनाचे पोषण करते. असत्य जीवनाला खाली खेचते. त्या संदर्भात, ही म्हण शंभर टक्के खरी आहे.