HIV Vaccine : अभिमानास्पद! नागपूरकरांनी शोधली एड्सची लस, उंदरावर प्रयोग यशस्वी

ही लस उंदरावर यशस्वी झाली असून याची चाचणी आता माणसांवरही होणार आहे.
HIV Vaccine
HIV Vaccinesakal

HIV Vaccine : एचआयव्ही हा असा आजार आहे ज्यावर अजुनही अधिकृत औषध आलेले नाही. त्यामुळे भारतासह जगभरात एड्सवरील औषध शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच नागपूरच्या नेब्रास्का मेडीकल सेंटर आणि प्रायोगिक न्युरोसायन्स विद्यापिठानी एड्सवरील लस शोधून काढली आहे.

ही लस उंदरावर यशस्वी झाली असून याची चाचणी आता माणसांवरही होणार आहे. या संदर्भात नागपूरच्या नेब्रास्का मेडीकल सेंटर आणि प्रायोगिक न्युरोसायन्स विद्यापिठाचे वैज्ञानिक डॉ. सांथी गोरंटनी याबाबत माहिती दिली. (The Worlds First HIV Vaccine developed at UNMC Nagpur read story)

दरवर्षी देशभरात दहा लाख सत्तर हजार एड्सचे रुग्ण निघतात. सुरवातीला जेव्हा लस नव्हती तेव्हा अनेक लोक एड्सचे बळी पडायचे पण आता एड्सच्या लसीमुळे एड्स पसरण्यावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. शिवाय या लसीमुळे रुग्ण बराच काळ जीवंत राह शकतात. मात्र लस बंद केल्यावर एड्स पुन्हा होण्याची शक्यता असते.

HIV Vaccine
HIV Prevention : एड्स होण्यापासून आपण स्वतःला कसे दूर ठेऊ शकतो?

अशात नागपूरच्या नेब्रास्का मेडीकल सेंटर आणि प्रायोगिक न्युरोसायन्स विद्यापिठानी शोधून काढलेली ही लस माणसावर किती यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार.

मुळात उंदीर आणि माकडावर संशोधन करणे, खूप मोठे आव्हान असते. अनेक लसी प्राण्यांवर यशस्वी होतात पण माणसावर होत नाही. त्यामुळे ही लसही माणसावर यशस्वी होणार का? हे पाहावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com