Black Sesame Benefits : यकृत निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत काळे तीळ, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Black Sesame Benefits : पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेले काळे आणि पांढरे तीळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. काळ्या तीळामध्ये कॅल्शिअम, फायबर्स, लोह, फॉस्फरस यांसारखे अनेक पोषकघटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.
Black Sesame Benefits
Black Sesame Benefitsesakal

Black Sesame Benefits : सध्या देशातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये आहाराची खास काळजी घेणे, गरजेचे आहे. या दिवसांमध्ये आपल्या आहारात अनेक घटकांचा समावेश केला जातो. ज्यामध्ये पांढरे आणि काळे तीळ यांचा ही समावेश आहे.

पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेले काळे आणि पांढरे तीळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तीळापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. काळ्या तीळामध्ये कॅल्शिअम, फायबर्स, लोह, फॉस्फरस यांसारखे अनेक पोषकघटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

आतापर्यंत तुम्ही पांढऱ्या तीळाचे फायदे वाचले असतील, मात्र, आज आम्ही तुम्हाला काळ्या तीळाचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात हे फायदे.

Black Sesame Benefits
Iron Rich Foods: रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

काळ्या तीळामध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. ही पोषकतत्वे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. यामध्ये कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, तांब आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी गुणधर्म आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत तर होतेच शिवाय, इतर संसर्गांपासून संरक्षण होते. ज्यामुळे, अनेक प्रकारचे आजार रोखले किंवा टाळले जाऊ शकतात.

यकृत राहते निरोगी

काळ्या तीळापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. तीळाचा आहारात समावेश केल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यासोबतच यकृत देखील निरोगी राहते. त्यामुळे, आपल्या दैनंदिन आहारात मर्यादित प्रमाणात काळ्या तीळाचा जरूर समावेश करा.

पचनाशी निगडीत समस्या करते दूर

काळ्या तीळामध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, जेव्हा आपण काळ्या तीळाचा आहारात समावेश करतो, तेव्हा त्याचा आपल्या पचनक्षमतेला फायदा होतो. कारण, यामुळे शरीरातील आतड्यांची प्रक्रिया तर सुलभ होतेच, शिवाय, पोटाच्या किंवा पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

त्यामुळे, ज्या लोकांना पचनाशी निगडीत समस्या आहेत, त्यांच्यासाठी काळे तीळ हा एक रामबाण उपाय आहे. त्यांनी आहारात मर्यादित प्रमाणात या काळ्या तीळांचा जरूर समावेश करावा.

Black Sesame Benefits
Magnesium rich foods : तुमच्या शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता आहे? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com