Benefits of Walnuts : हिवाळ्यात अक्रोड खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

अक्रोडमध्ये जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते.
Benefits of Walnuts
Benefits of Walnuts esakal

Benefits of Walnuts : ड्रायफ्रूट्स खायला आपल्या सर्वांनाच आवडते. ड्रायफ्रूट्समध्ये अनेक प्रकारचे घटक येतात. त्यामध्ये, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, अंजीर, चारोळ्या, खारीक, खजूर आणि मनुका यांचा समावेश आढळून येतो. ड्रायफ्रूट्सला सुकामेवा असे ही म्हटले जाते. कारण, यातील सर्व घटक हे सुकवलेले असतात. त्यामुळे, त्यात जीवनसत्वे आणि खनिजांचे भरपूर प्रमाण आढळून येते.

या सुकामेव्याचे रोज पुरेशा प्रमाणात सेवन केल्याने शरीराला शक्ती तर मिळतेच शिवाय, शरीरातील कमतरता भरून काढली जाते. या सुकामेव्यातील महत्वाचा घटक म्हणजे अक्रोड होय.

अक्रोडमध्ये जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, अक्रोडचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिवाळ्यात अक्रोड खाण्याचे कोणते फायदे आहेत? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Benefits of Walnuts
Benefits of Soaked Peanuts : भिजवलेले शेंगदाणे आरोग्यासाठी आहेत लाभदायी, जाणून घ्या फायदे

मधुमेहाला ठेवते नियंत्रित

अक्रोडचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेह आणि टाईप २ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी हिवाळ्यात आवर्जून अक्रोडचे सेवन करावे. शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

हाडांना मिळते बळकटी

हिवाळ्यात खास करून हाडांशी संबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जर तुम्हाला या संदर्भातील समस्यांचा सामना करावा लागत असेल तर, रोज सकाळी अक्रोडचे सेवन करा.

अक्रोडमध्ये आढळून येणाऱ्या अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिडमुळे आपल्या शरीरातील कमकुवत हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. जर तुम्हाला हाडांशी संबंधित समस्या असतील आणि मांसपेशींमध्ये वेदना होत असतील तर तुम्ही रोज अक्रोडचे सेवन करण्यास सुरूवात करा. यामुळे, तुमच्या हाडांना आणि दातांना बळकटी मिळेल.

वजन कमी करण्यास लाभदायी

हिवाळ्यात अक्रोडचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर्स, फॅट्स आणि जीवनसत्वांचे मुबलक प्रमाण आढळून येते. ज्यामुळे, अक्रोडचे सेवन केल्यानंतर भूक कमी लागते आणि पोट भरलेले राहते. शिवाय, दिवसभर आपल्या शरीरात ऊर्जा राहते.

अक्रोडमध्ये मूळात कॅलरीजचे प्रमाण कमी असते, त्यामुळे, आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जर तुम्हाला ही वजन कमी करायचे असेल तर अक्रोडचे सेवन करायला सुरूवात करा.

Benefits of Walnuts
Benefits Of Anjeer : हिवाळ्यात हेल्दी रहायचे असेल तर भिजवलेल्या अंजीराचे करा सेवन, जाणून घ्या ‘हे’ फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com