PCOD Problem : 'या' चुकीच्या सवयींमुळे होतो महिलांना पीसीओडीचा त्रास

आज आम्ही त्यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि उपाय सांगणार आहोत.
PCOD Problem
PCOD Problemsakal

PCOD Problem : आज देशातील सरासरी 10पैकी 8 महिला मासिक पाळी किंवा PCOD ने त्रस्त आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या राहणीमानात देखील मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे.

मासिक पाळी नियमित असेपर्यंत शरीराला आवश्यक असलेली हार्मोन्स सुरळीत निर्माण होत असतात. वात -पित्त- कफ संतुलित राहून सौंदर्य खुलत असतं पण PCOD ने त्रस्त असलेल्या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज आम्ही त्यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि उपाय सांगणार आहोत. (these bad habits causes PCOD Problem healthy lifestyle)

पीसीओडीची प्रमुख लक्षणे :-

  • मासिक पाळी अनियमित होते

  • त्वचा काळवंडते ,पिंपल्स ,वांग येते.

  • वजन वाढते.

  • डोक्यावरचे केस गळतात, पांढरे होतात.

  • अनावश्यक केसांची लव वाढते.

  • चिडचिड, कंटाळा, नैराश्य वाढते.

PCOD Problem
Period : मासिक पाळीत ५ पदार्थ खाणं टाळा

PCOD ची कारणे :-

१) संतुलित आहाराची कमतरता-

फास्ट लाईफस्टाईलमध्ये हल्ली फास्टफूडचे सेवन अधिक प्रमाणामध्ये होत असल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते. त्यामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन वाढू लागले आहे.

२) चुकीचे राहणीमान-

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यात अनेक बदल घडून आले आहेत.

३) व्यायामाचा अभाव-

आधुनिक जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी किंवा व्यायामाचा अभावयामुळे सुद्धा नकळत पीसीओडी या आजाराला आमंत्रण दिले जाते.

PCOD Problem
Mango Leaf Health Benefits : आंब्याच्या पानांत दडलाय आरोग्याचा मंत्र...

PCOD वरील उपाय:-

१) संतुलित आहार

२) नियमित व्यायाम - दररोज कमीत कमी बारा वेळा सूर्यनमस्कार घालावेत.

३) अति ताण घेणे टाळा

४) आयुर्वेदामध्ये PCOD बरा करण्यासाठी औषधी उपलब्ध आहे त्याचा वापर करा.

५) वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्म करून घ्यावे.

पीसीओडीचा आपल्या गर्भधारणेवर देखील परिणाम होऊ शकतो त्यामुळे वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण आपल्या स्वास्थ्याला होणारा त्रास कमी करू शकता.

- डॉ. राजश्री आढव

आयुर्वेदीक आणि पंचकर्मातज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com