Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

Weight Gain Foods : सध्याची बिघडलेली जीवनशैली, फास्टफूडचे वाढलेले सेवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढतेय.
Weight Gain Foods
Weight Gain Foodsesakal

Weight Gain Foods : सध्याची बिघडलेली जीवनशैली, फास्टफूडचे वाढलेले सेवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढतेय. आजकाल लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण यामुळे त्रस्त झाले आहेत. खर तर लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येमुळे इतर आजारांना ही आयतेच आमंत्रण मिळतेय.

या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे. आजकाल प्रत्येकाची जीवनशैली व्यस्त आणि गुंतागुतींची झाली आहे. त्यामुळे, लोकांना स्वत:साठी वेळ मिळत ही. अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढतोय.

Weight Gain Foods
Blood Sugar Control : साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टींपासून राहा दूर, महिन्याभरात दिसून येईल फरक

या व्यतिरिक्त असे अनेक खाद्यपदार्थ आहेत की, जे जवन वाढवण्यास हातभार लावू शकतात. आपल्या दैनंदिन जीवनात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत, ज्यात साखर असते. परंतु, तुम्हाला याची पुसटशी जाणीव ही नसते. परंतु, हे खाद्यपदार्थ नकळतपणे खाल्ले जातात.  हे खाद्यपदार्थ तुमचे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

साखरयुक्त पेय

उन्हाळ्यात अनेकांना थंडगार पेय प्यायला आवडतात. परंतु, या थंडगार पेयांमध्ये अनेकदा साखर मोठ्या प्रमाणात आढळते. खास करून कोल्डड्रिंक्समुळे आरोग्याला गंभीर हानी होते शिवाय, वजन देखील वाढते. यामध्ये असलेली साखर आणि कॅलरीजमुळे शरीराची चरबी वाढण्याची शक्यता असते. परिणामी वजनावर याचा परिणाम होतो. त्यामुळे, लठ्ठपणा टाळण्यासाठी साखरयुक्त पेय, स्पोर्ट्स ड्रिंक्स, स्वीट कॉफी, कोम्बुचा आणि कॉकटेलपासून लांबच राहा. (Sugary Drinks)

मफिन

मफिन हा एक गोड पदार्थ आहे, जो सर्व वयोगटातील व्यक्तींना खायला आवडतो. खास करून लहान मुलांना मफिन खायला प्रचंड आवडते. परंतु, याचा आहारात समावेश करण्यापूर्वी विचार जरूर करा. कारण, मफिनमध्ये साखरेचे सर्वाधिक प्रमाण आढळते.

खूप कमी लोकांना माहित असेल की, मफिनमध्ये ४२ ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात साखर असते. महत्वाची बाब म्हणजे ही साखर कोकच्या कॅनपेक्षा ही कित्येक पटींनी जास्त असते. त्यामुळे, लठ्ठपणा टाळण्यासाठी मफिनचे अधिक सेवन करणे टाळा. (Muffins)

दही

दही खायला सगळ्यांना आवडते. आरोग्यासाठी फायदेशीर असणारे दह्यामध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. हे खूप कमी लोकांना माहित असेल. जेव्हा दह्यामध्ये जाम, सरबत, साखर किंवा इतर टॉपिंग्सचा वापर करून चवीनुसार बनवले जाते, तेव्हा त्या अतिरिक्त साखर आणि कॅलरीजचे प्रमाण असते. त्यामुळे, अधिक प्रमाणात दह्याचे सेवन करू नका. (Curd)

Weight Gain Foods
Weight Gain During Pregnancy : गर्भधारणेदरम्यान वजन वाढणे सामान्य आहे का?

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com