
doctor warning on diet,
Sakal
धावपळीच्या जीवनशैलीमुळे पॅक केलेले स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, साखरेचे पेये आणि प्रक्रिया केलेले मांस यांचा वापर वाढला आहे.
या पदार्थांमुळे लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढतो.
नवीन संशोधनानुसार, या पदार्थांमुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका ४१% वाढतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
Doctor Warning On Diet: आजकाल वाढत्या डिजिटल युगासोबतच अनेक लोक वेळेच्या अभावामुळे पॅक केलेले स्नॅक्स,इंस्टंट नूडल्स, पेये, फ्रोझन पदार्थांचे सेवन करतात. जे लोक हे सर्व पदार्थ आनंदाने खातात त्यांना लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह यासारख्या समस्या भेडसावतात. शास्त्रज्ञांनी आधीच सांगितले आहे की प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे कॅन केलेला किंवा पॅक केलेले अन्न लठ्ठपणा, हृदयरोग आणि मधुमेह यासारखे अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरते. आता एका नवीन संशोधनात असं म्हटलं आहे की हे प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो.