Kidney health tips: 'या' पाच गोष्टी सतत खात राहाल तर तुमची किडनी काम करणं बंद करेल

हे पदार्थ खाऊन तुम्ही आजारांंना निमंत्रण द्याल. त्यामुळे असे पदार्थ अतिजास्त प्रमाणात खाऊ नका.
Kidney health tips: do not eat these five things
Kidney health tips: do not eat these five thingsesakal

Kidney health tips: आपण लहानपणापासून विज्ञानाच्या अनेक धड्यांमध्ये शारीराचे अवयव आणि त्यांच्या क्रिया यांचा अभ्यास करत आलोय. या अवयवांचं आपल्या जगण्यासाठी किती महत्व आहे हेही आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. मात्र शेवटी आपण आपल्या शरीर अवयवयांना निरोगी ठेवण्यासाठी आपण काय करतो आणि त्यांना निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने आपण विचार करतो का ते जास्त महत्वाचे ठरते. आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार महत्वाचा ठरतो.

तुम्ही व्यवस्थित आहार न घेता बाहेरच्या गोष्टी जास्त खाण्यात घेतल्या तर याचा परिणाम तुमच्या किडनीवर होऊ शकतो. आणि तुम्ही हे सगळं करत आजारांना आमंत्रण द्याल. त्यामुळे खालील पदार्थ अतिजास्त खात असाल तर ते लगेच बंद करा.

Kidney health tips: do not eat these five things
Healthy Lifestyle: जास्त Stress नी वजन घटतं? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

मेयोनिज

मेयोनिजच्या एका चमच्यात १०३ कॅलरिज असतात. यासोबतच यात सॅचुरेटेड फॅट्स पण जास्त असतात. तुम्ही ग्रील्ड सँडविच आणि मोमोज सोबत मेयोनिज खात असाल तर त्याचं अतिप्रमाण शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कमी कॅलरीच्या मेयोनिज आणि शुगर असणाऱ्या मेयोनिजचा वापर करा. त्याला सुपर हेल्दी बनवण्यासाठी ग्रीक योगर्ट किंवा हंग कर्डमध्ये त्याला बदलणं कधीही उत्तम उपाय ठरेल.

फ्रोजन मिल्स

अभ्यासातून पुढे आले आहे की, फ्रोजन जेवण किंवा ओवनमध्ये बनलेले जेवण शरीरासाठी सर्वात जास्त घातक ठरू शकते कारण यामुळे शरीरात मधुमेहाला सुरूवात होते. त्यामुळे तुम्ही असा आहार घेऊन मधुमेहाच्या आजाराला आमंत्रण द्याल.

सोडा

सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. तसेच सोड्यामध्ये पोषणयुक्त असे काहीच नसते. मात्र हे आहारात अतिरिक्त कॅलरीज जोडण्याचे काम करते. ज्यामुळे तुमचं वजन वाढतं. अभ्यासातून असे पुढे आले आहे की, सोड्याचं सेवन केल्यानं ऑस्टियोपायरोसिस, गुडघ्यांचं दुखणं आणि दातांचं दुखणं यासारखे आजार उद्भवू शकतात. (Health)

प्रोसेस्ड मीट

बेकन, सॉसेज, हॉट डॉग आणि बर्गर सारख्या प्रोसेस्ड मीटने किडनीचं स्वास्थ्य धोक्यात येऊ शकतं. हे सगळे हाय सोडियमयुक्त खाद्य पदार्थ असतात. आणि अतिरिक्त सोडियम ब्लड प्रेशर बाढवतं. ज्यामुळे तुमच्या गुडघ्यांचं दुखणं वाढतं.

डीप फ्राय पोटॅटो

जर तुम्हा फ्रेंच फ्राइजच्या रूपात चिप्स सारखे पॅक फास्ट फूड खाल्ल्याने किडनीला धोका उद्भवतो. त्यामुळे डीप फ्राय अन्न घेणं टाळा. बटाट्यामध्ये पोटॅशिमयची मात्राही अधिक असते.

शरीराची काळजी आपण नीट घेतली तर शुगर, ब्लड प्रेशर यांसारख्या आजारापासून तुम्ही थोडक्यात तुमचा बचाव करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com