Healthy Lifestyle: जास्त Stress नी वजन घटतं? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

खरंच जास्त तणावामुळे वजन कमी होते का?
healthy lifestyle
healthy lifestylesakal

Healthy Lifestyle: वजनबाबत प्रत्येकजण खुप काळजी घेत असतो. काही लोकांना वजन कमी होण्याची समस्या असते तर काही लोकांना वजन वाढण्याच्या समस्या असतात. तुम्ही अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल की काही लोकांचे मानसिक तणावामुळे वजन वाढते. कारण तणावाचा आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थ वर खुप खोलवर परिणाम होतो. मात्र एका रिसर्चमध्ये एक थक्क करणारी बाब समोर आली आहे.

जास्त तणावामुळे काही लोकांचे वजन कमी होते, असं या रिसर्चमध्ये सांगितलयं. खरंच जास्त तणावामुळे वजन कमी होते का? शरीरासाठी हे किती हानिकारक आहे? या संदर्भात आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

healthy lifestyle
Health: उत्तम आरोग्य आणि उत्तम चव देणारे नाचणीचे लाडू कसे तयार करायचे?

काय सांगतो रिसर्च?

एका रिसर्चनुसार स्ट्रेसमुळे आपल्या आरोग्यवर गंभीर परिणाम होतो आणि यामुळे आपल्या वागण्यातही बदल जाणवतो. स्ट्रेसमुळे काही लोकांच्या वजनात सुद्धा बदल दिसून येतात. तणावामुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी सुदधा बदलतात ज्यामुळे वजन कधी कमी तर कधी जास्त वाढण्याची शक्यता वाढते. यात दिलासादायक बाब म्हणजे स्ट्रेसला कंट्रोल करताना तुम्ही वजन सुद्धा कंट्रोल करू शकतात.

healthy lifestyle
Healthy Lifestyle: आठवड्याभरात वजन होणार कमी; या वेळी करा ड्रायफ्रुट्सचे सेवन

स्ट्रेसमुळे असे कमी होते वजन
तणावामुळे आपल्या शरीरातील सिंपैथेटिक नर्वस सिस्टम एपिनेफ्रीन ला ट्रिगर करते, ज्यामुळे शरीराचे फाइट रिस्पांस सिस्टम अॅक्टिवेट होतात. अशा परिस्थितीत आपल्या ह्रदयाचे ठोके वाढतात आणि श्वास घेताना वेग वाढतो यामुळे शरिरातील कॅलेरी जास्त बर्न होते. यामुळे डायजेशन आणि ब्लड शुगर लेवल बदलते. आणि वेट लॉसला सुरवात होते

healthy lifestyle
दवा न खाना! : Art of Drugless Healing

त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा

तणावामुळे ब्रेन और गॅस्ट्रोइंटेस्टाइनल यांच्यात कम्युनिकेशन वाढते त्यामुळे हार्टबर्न, गॅस, ब्लोटिंग, पोटाचे दुखणे, उल्टी, डायरिया आणि मांसपेशियों मध्ये समस्या दिसून येतात. या सर्व परिस्थितीत जेवण करणे कठीण होतं आणि वजन घटतं. हे शरिरासाठी जीवघेणं ही ठरू शकतं त्यामुळे अशात डॉक्टरांशी संपर्क साधणे, हि पहिली प्राथमिकता समजावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com