Muscle Cramps : वर्कआऊट केल्यानंतर मसल्स क्रॅम्प्सची समस्या जाणवते? मग, फॉलो करा ‘या’ टिप्स

वर्कआऊट केल्यानंतर अनेकांच्या स्नायूंमध्ये वेदना होतात.
Muscle Cramps
Muscle Crampsesakal

Muscle Cramps after Workout : आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण सर्वांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि त्याला व्यायामाची जोड असणे गरजेचे आहे.

व्यायाम केल्याने आपले शरीर फिट राहण्यास मदत होते. फिट राहण्यासाठी मग काहीजण चालायला जातात, पळायला जातात, जॉगिंग करतात, व्यायाम करतात, जिमला जाऊन वर्कआऊट करतात, अशा अनेक शारीरिक हालचाली करून आपण शरीर अ‍ॅक्टिव्ह आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

मात्र, वर्कआऊट केल्यानंतर अनेकांच्या मसल्समध्ये वेदना होतात किंवा ज्याला मसल्स क्रॅम्प्स होणे, असे ही म्हटले जाते. या समस्या सुरू होतात. आपण जेव्हा जास्त शारीरिक हालचाली करतो, तेव्हा स्नायूंमध्ये वेदना होणे हे सामान्य आहे.

आज आपण वर्कआऊट केल्यानंतर होणाऱ्या मसल्स क्रॅम्प्सची समस्या दूर करण्यासाठी काही सोप्या टीप्स जाणून घेणार आहोत. कोणत्या आहेत त्या टीप्स चला तर मग जाणून घेऊयात.

Muscle Cramps
Yoga For Active Body : आळस घालवण्यासाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने; शरीरात येईल चपळता

वॉर्मअप आणि कूलडाऊन महत्वाचे

जर तुम्हाला वर्कआऊट केल्यानंतर मसल्स क्रॅम्प्सची समस्या टाळायची असेल तर नेहमी वॉर्मअप आणि कूलडाऊन करायला विसरू नका. वर्कआऊट किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप केले जाते. हे केल्याने आपल्या शरीरातील स्नायू अ‍ॅक्टिव्हिटी करण्यासाठी तयार होतात. असे केल्याने स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होते.

अशाच प्रकारे वर्कआऊटची तिव्रता हळूहळू कमी करण्यासाठी कूलडाऊन व्यायाम करणे महत्वाचे आहे. कूलडाऊन केल्याने तुमच्या स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येण्याची शक्यता देखील बऱ्यापैकी कमी होते. त्यामुळे, कूलडाऊन आणि वॉर्मअप अवश्य करा.

हायड्रेटेड रहा

मसल्स क्रॅम्प्सची समस्या दूर करण्यासाठी आपले शरीर हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. अनेकदा डिहायड्रेशनमुळे मसल्समध्ये क्रॅम्प्सची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, तुम्ही हायड्रेटेड राहणे हे फार महत्वाचे आहे.

त्यामुळे, वर्कआऊट करण्यापूर्वी आणि वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे हे खूप महत्वाचे आहे. यामुळे, तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.

स्ट्रेचिंगवर करा फोकस

तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल की, स्ट्रेचिंग केल्याने तुमच्या मसल्स क्रॅम्प्सची समस्या काही प्रमाणात कमी होते. जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग करता तेव्हा शरीराची लवचिकता वाढण्यास आणि सुधारण्यास मदत होते.

Muscle Cramps
Aqua Yoga Benefits : वजन कमी करण्यासाठी लाभदायी आहे अ‍ॅक्वा योगा, जाणून घ्या फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com