Yoga Tips : पहिल्यांदाच योगा करताय? मग, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, सराव होईल सुलभ

Yoga Tips : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे योगा करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
Yoga Tips
Yoga Tips esakal

Yoga Tips : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे योगा करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. योगासोबतच संतुलित आहार घेणे देखील महत्वाचे आहे. योगा केल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. त्यासाठी, दररोज विविध प्रकारच्या आसनांचा सराव करणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे सर्व वयोगटातील व्यक्ती योगाचा सराव करू शकतात. आजकाल अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही योगाच्या विविध आसनांची मदत घेऊ शकता. योगामुळे, त्या समस्यांपासून आराम मिळतो. योगाचे महत्व समजू लागल्यामुळे लोक आजकाल युट्यूब किंवा ऑनलाईन व्हिडिओ पाहून योगासनांचा सराव करू लागले आहेत.

परंतु, जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करणार असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. योगाचा सराव करताना काही मुलभूत चुकांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे, पहिल्यांदाच योगा करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

Yoga Tips
Yoga Tips : शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर, जाणून घ्या सरावाची पद्धत

रिकाम्या पोटी करा योगा

जर तुम्ही पहिल्यांदाच योगासनांचा सराव करणार असाल तर तुम्हाला हे माहित असायला हवे की, योगाचा सराव हा रिकाम्या पोटी करणे महत्वाचे असते. शक्यतो सकाळच्या वेळेत योगा करण्याचा सल्ला दिला जातो.

परंतु, जर तुम्हाला सकाळी योगा करायला वेळ मिळत नसेल तर, लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा कधी योगा कराल त्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नका. तसेच, योगा केल्यावर लगेच अन्न खाऊ नका. शरीराला थोडी विश्रांती द्या त्यानंतर, थोडफार खा.

वॉर्म अप करा

योगाचा सराव करण्यापूर्वी वॉर्म अप करावे. जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करत असाल तर थेट योगा मॅटवर बसून लगेच योगासन करू नका. शरीर सक्रिय ठेवण्यासाठी सर्वात आधी वॉर्म अप करा. शरीराची नीट हालचाल झाली की, मग योगासनांचा सराव करा.

सैलसर कपडे

योगाचा सराव करताना आरामदायक कपडे परिधान करा. जेणेकरून तुम्ही योगाचा सराव व्यवस्थित करू शकता. घट्ट कपडे परिधान केल्याने शरीराच्या स्नायूंमध्ये ताण पडून कपडे फाटण्याची भीती असते. घट्ट कपड्यांमुळे तुम्ही योगावर नीट लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे, योगा करताना सैलसर कपडे परिधान करा.

Yoga Tips
Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com