Yoga Tips : शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर, जाणून घ्या सरावाची पद्धत

Yoga Tips : सतत लॅपटॉपसमोर बसून काम आणि या बैठ्या कामामुळे शरिराची हालचाल कमी होते. त्यामुळे, अतिरिक्त चरबी वाढते.
Yoga Tips
Yoga Tipsesakal
Updated on

Yoga Tips : रोजची कामाची गडबड, बिघडलेली जीवनशैली, कामाचा ताण-तणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. सतत लॅपटॉपसमोर बसून काम आणि या बैठ्या कामामुळे शरिराची हालचाल कमी होते. त्यामुळे, अतिरिक्त चरबी वाढते.

शारिरीक हालचाल नसेल तर ही पोटावरील चरबी हळूहळू संपूर्ण शरीरात जमा होऊ लागते. त्यानंतर, मग लठ्ठपणा अधिक उठून दिसतो. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि वाढलेली चरबी कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात.

परंतु, आता यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. विविध प्रकारची योगासने नियमितपणे केल्याने जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

Yoga Tips
Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

वृक्षासन

वृक्षासनाचा नियमित सराव केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे राहा. त्यानंतर, तुमचा उजवा पाय जमिनीवरून उचलून डाव्या पायावर ठेवा. या स्थितीमध्ये शरीराचे वजन संतुलित ठेवा.

आता हळूहळू उजवा पाय तुमच्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. तळहातांनी आधार ही तुम्ही देऊ शकता. आता तुमचे दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेत जोडून आकाशाकडे न्या. आता या स्थितीमध्ये १५-२० सेकंद थांबा, तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. आता सामान्य स्थितीमध्ये या आणि दुसऱ्या पायाने हे योगासन पुन्हा करा. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

उत्कटासन

या योगासनाला खुर्चीची मुद्रा म्हणून ही ओळखले जाते. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी दोन्ही पायांमध्ये थोडी जागा ठेवून सरळ रेषेत उभे राहा. त्यानंतर, समोरच्या दिशेने हात पसरवा आणि नमस्काराच्या मुद्रेमध्ये दोन्ही हातांचे तळवे जोडून घ्या.

त्यानंतर, तुमचे दोन्ही हात वर करा आणि दोन्ही पायांचे गुडघे वाकवा. आता तुमचे दोन्ही गुडघे सरळ ठेवून नमस्कार आसनात या आणि या स्थितीमध्ये तुमच्या पाठीचा कणा सरळ ताठ ठेवा. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने तुमची पोटाची चरबी कमी होईल. शिवाय, तुमचे वजन ही नियंत्रणात येईल.

Yoga Tips
World Liver Day 2024 : यकृत निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.