Weight Loss Diet : अति खाण्यानेच नव्हे तर थायरॉइडनेही वाढते वजन, असे ठेवा नियंत्रणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss Diet

Weight Loss Diet : अति खाण्यानेच नव्हे तर थायरॉइडनेही वाढते वजन, असे ठेवा नियंत्रणात

Weight Loss Diet : दैनंदिन जीवनातील काही बदलांमुळे आपल्याला आपलं वजन वाढतं असं वाटतं. मात्र वजन वाढण्याची आणखी काही कारणेदेखील असू शकतात. हायपोथायरॉइडिझममुळे देखील तुम्हाला तुमचं वजन वाढलेलं दिसेल. ही समस्या कोणत्याही वयात तुम्हाला जाणवू शकते. तेव्हा आपण या समस्येवरील घरघुती उपाय आज जाणून घेऊया.

जर तुम्ही थायरॉइडचे रूग्ण असाल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करून घ्या.

नट्स आणि सीड्स - नट्स आणि सीड्स सेलेनियमचा प्रमुख स्त्रोत आहे. चिया सीड्समध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे याने तुमचे पोट दीर्घकाळ भरून राहाते. त्यामुळे तुमचं वजनही नियंत्रणात राहील.

दाळ आणि बीन्स - दाळ शरीराला प्रोटीन पुरवण्याबरोबरच मेटाबोलिझम वाढवण्यासही मदत करते. याने वजन कमी होण्यासही मदत होते. (Weight Loss)

अंडी - अंड्याच्या पिवळ्या भागात झिंक आणि सेलेनियम असते. तर अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन असते. मधुमेह आणि वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी अंडी हा उत्तम ठरू शकतात.

हेही वाचा: Weight Loss Tips : पोटाच्या ढेरीकडे बघून वजन कमी नाही होणार; पहा काय आणि किती खावं?

भाज्या - टोमॅटो, शिमला मिर्ची यांच्यामध्ये व्हिटामिन भरपूर प्रमाणात असतं. ते खाल्ल्याने थायरॉइड कमी होतो. सोबतच ते फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतात. ज्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. (Thyroid)

पाणी आणि कॅफिनमुक्त वस्तू - अतिप्रमाणात पाणी पिऊनही तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. याने हार्मोन्सही कंट्रोलमध्ये राहाण्यास मदत होते.