Not feeling mentally excited woman pregnancy
sakal
माझे वय २५ वर्षे आहे. मला सतत थकवा जाणवतो, मानसिक उत्साह वाटत नाही, सतत डोळे दुखत असतात, कधी कधी लालही होतात, डोळ्यांत त्राण नाही असे वाटते, कधीही ताजेतवाने वाटत नाही. कृपया उपाय सुचवावा.
- श्री. गजानन, पुणे
उत्तर : सध्याच्या काळात होणारा स्क्रीनचा अतिशय वापर, सतत प्रवास, यामुळे अनेकांना बर्न्ट आउट सिंड्रोम जाणवत असतो. याच्यात शरीरात प्रामुख्याने पित्ताचे असंतुलन जाणवते. सध्या रोज न चुकता अर्धा-एक कप दूध संतुलनचा शतानंत कल्प घालून नक्की घ्यावे. सकाळी न्याहारीच्या वेळी एक चमचा संतुलनचा गुलकंद स्पेशल घ्यावा. रात्री झोपताना तळपायांना संतुलन पादाभ्यंग घृत लावून पादाभ्यंग करावे.
दिवसातून एकदा तरी निरशा दुधाच्या व एकदा गुलाबपाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात. ताकद येण्याच्या दृष्टीने रोज संतुलनचे धात्री रसायन, आत्मप्राश किंवा च्यवनप्राश घेण्याचा फायदा मिळू शकेल. स्क्रीन टाइम जेवढा कमी ठेवता येईल तेवढे उत्तम. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे गाडीत प्रवास करत असताना मोबाईल वा स्क्रीनचा वापर टाळावा. एकदा रक्ततपासणी करून घेऊन कुठल्या जीवनसत्त्वाची, मिनरल्सची कमतरता आहे, हे बघणे उत्तम राहील.