TitiBhasana: टीटीभासन हे हातांवर शरीर तोलून करण्याचे अवघड आसन आहे. योग्य मार्गदर्शन व नियमित सरावाने हे उत्तम अमू शकते. हे आसन दोन पद्धतींनी करता येते, त्यातील एक पद्धत आपण पाहूया..असे करावे आसन• प्रथम दंडस्थिती म्हणजे ताठ उभे राहावे, त्यानंतर दोन्ही पायांत खांद्यांएवढे अंतर घ्यावे. मग कमरेतून पुढे वाकावे. • गुडघे थोडेसे वाकवावे. दोन्ही हातांचे तळवे दोन्ही पावलांच्या बाहेरच्या बाजूला येतील याप्रमाणे जमिनीवर टेकवावे, डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाच्या करंगळीजवळ व उजव्या हाताचा तलवा उजव्या पावलाच्या करंगळीजवळ येईल याप्रमाण तळवे टेकवावेत.• दोन्ही पावलांमधील अंतर आपण खांद्याएवढे घेतलेले आहे, ते आवश्यक आहे. हातांचे तळवे जमिनीवर टेकवल्यावर दोन्ही हातांवर वजन देत दोन्ही पाय जमिनीपासून हळूहळू वर उचलावे.• पावले वरच्या दिशेला येतील एवढी वर उचलावीत. दोन्ही गुडघे ताठ असावेत.• छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा, शक्य तितका वेळ आसनामध्ये स्थिर राहावे. • आसन सोडताना उलट क्रमाने सावकाश सोडावे..Ashtavakrasana: या योगासनाला अष्टवक्रासन हे नाव कसं पडलं? जाणून घ्या फायदे .लाभ• यामध्ये हातांवर व पार्यावर उत्तम ताण आल्याने तेथील स्नायूंची कार्यक्षमता वाढते. • हे तीलात्मक आसन असल्याने एकाग्रता व आत्मविकास वाढवण्यास मदत होते..काळजी • हे आसन उत्तम जमण्यासाठी प्रथम कुर्मासन जमणे फार आवश्यक आहे. झटका देऊन पाय उचलू नये ही दक्षता घ्यावी. योग जीवनमनाली देव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.