Toilet Hygiene Tips for Women to Prevent UTI
sakal
UTI Prevention Tips for Women: दरवर्षी जगभरात वर्ल्ड टॉयलेट डे साजरा केला जातो. स्वच्छता, प्रत्येक ठिकाणी स्वच्छ आणि सुरक्षित टॉयलेट उपलब्ध आहे का, अजूनही किती लोक या सुविधेपासून वंचित आहेत या सगळ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आज जगभरात कितीतरी महिला स्वच्छ आणि सुरक्षित टॉयलेट्सपासून वंचित आहेत. त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI), अतिसार (diarrhea), कॉलरा (Cholera), टायफॉईड, हिपॅटायटिस A यांसारख्या अनेक संसर्गांचा धोका वाढतो. याचा महिलांचे आरोग्य, सुरक्षितता यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे योग्य स्वच्छता बाळगणे आणि टॉयलेट वापरताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आज 'वर्ल्ड टॉयलेट डे'च्या निमित्तानं महिलांनी हायजिन कास मेंटेन करायचं ते जाणून घेऊया.