Tonsillitis Symptoms: तुम्हालाही सारखा टॉन्सिल्सचा त्रास होतोय, मग वेळीचं लक्षण ओळखून करा घरगुती उपाय

टॉन्सिलचा त्रास कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र खास करून लहान मुलांना ही समस्या वारंवार उद्भवण्याची शक्यता असते. व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे ही समस्या निर्माण होते
Tonsillitis Symptoms in marathi
Tonsillitis Symptoms in marathi Esakal

Tonsillitis Home Remedies: अनेकांना आजवर एकदा तरी टॉन्सिल्सचा त्रास झाला असेलच. टॉन्सिल किंवा टॉन्सिलायटीस Tonsillitis ही एक अशी समस्या आहे ज्यात घशाला Throat आतून सूज येते.

त्यामुळे एखादा पदार्थ खाताना किंवा पेय पिताना देखील त्रास होतो. हा एक इएनटी म्हणजेच ईयर नोज एंड थ्रोट प्रॉब्लेम आहे. Tonsils Symptoms and treatment in marathi Home Remedies for disease

खरं तर टॉन्सिल Tonsils हे आपलं इतर आजारांपासून Illness रक्षण करण्याचं काम करत असतात. कोणताही संसर्ग शरीरामध्ये जाण्यापासून रोखण्याचं काम ते करतात.

मात्र काही वेळेला टॉन्सिल्सलाच संसर्ग होऊ शकतो. अशा वेळीला टॉन्सिलच्या या गाठी लाल होतात आणि त्यांना सूज येते. यालाच टॉन्सिलायटीस म्हणतात.

टॉन्सिलचा त्रास कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र खास करून लहान मुलांना ही समस्या वारंवार उद्भवण्याची शक्यता असते.

व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे ही समस्या निर्माण होते. खरंतर टॉन्सिल होण्याआधी शरीरामध्ये काही बदल घडतात. शरीर काही संकेत देत असते हे लक्षणा वेळीच लक्षात घेतल्यास आपण टॉन्सिलच्या त्रास दूर करू शकतो.

टॉन्सिलायटीस म्हणजे काय? (what is tonsillitis disease)

टॉन्सिल्स या शरीरामध्ये व्हाईट ब्लड सेल्स निर्माण करण्याचं काम करतात. यामुळे शरीराला कोणत्याही संसर्गाशी लढण्याची ताकद मिळते. नाका आणि तोंडावाटे शरीरामध्ये जाणाऱ्या व्हायरस किंवा बॅक्टेरिया पासून संरक्षण करण्याचं काम टॉन्सिल्स करतात.

हे करत असताना अनेकदा टॉन्सिल्सलाच संसर्गाचा सामना करावा लागतो. अनेकदा स्ट्रेप्टोकोकल बैक्टीरिया (Streptococcal Bacteria) यांसारख्या सूक्ष्मजीवांमुळे टॉन्सिल्सला संसर्ग होतो आणि समस्या वाढू शकतात.

त्याचप्रमाणे घशातील इन्फेक्शन किंवा सर्दी यासारख्या समस्यांमध्ये देखील टॉन्सिल्सला सूज येण्याचा त्रास होऊ शकतो.

टॉन्सिल्सची लक्षण

१. टॉन्सिल्स येण्याआधी घसा दुखण्यास सुरुवात होते. अनेकदा या वेदनेची तीव्रता जास्त असते.

२. काहीवेळीस सुरुवातीला कानांच्या खालचा भाग दुखण्यास सुरुवात होते. तसचं जबड्याच्या खाली हलकी सूज येते अशा वेळी हे टॉन्सिलिटिसचं लक्षण असू शकतं.

३. तसचं घसा खवखवू लागतो आणि अन्न गिळण्यास त्रास होतो.

४. यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. काही वेळेला शरीराचं तापमान हलकं वाढू शकतं. यामुळे चिडचिड होते आणि कोणत्याही कामात लक्ष केंद्रीत होत नाही.

५. श्वासातून दुर्गंधी येऊ लागते.

६. लहान मुलांमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू शकतो तसचं कानांमध्ये खास येऊ शकते.

७. तसचं लहान मुलांमध्ये पोटदुखीचा त्रास देखील होवू शकतो.

ही काही टॉन्सिलायटीसची सामान्य लक्षण आहेत. ही लक्षण दिसताच काही उपाय केले तर त्रास कमी होवू शकतो.

हे देखिल वाचा-

Tonsillitis Symptoms in marathi
Tonsils: थंडीच्या काळात टॉन्सिलच्या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी 'हे' उपाय करा

- टॉन्सिल्सचा त्रास होवू लागल्यास किंवा टॉन्सिलिटिसची लक्षणं दिसू लागल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून या मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या.

- तसंच गरम पाण्यामध्ये चमचाभर मध मिसळून या पाण्याचं सेवन केल्यास टान्सिल्सचा त्रास कमी होतो.

- तसंच आल्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळू शकतो. यासाठी एक ग्लासभर पाण्यामध्ये आलं उकळून घ्यावं. त्यानंतर हे पाणी गार झाल्यावर गुळण्या कराव्य़ात.

- तसंच तुरटी पाण्यामध्ये उकळून हे पाणी कोमट झाल्यावर गुळण्या कराव्या यामुशे टॉन्सिल्सचं इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

- कांद्याच्या रसामुळे टॉन्सिल्समध्ये आलेली सूज कमी होवून वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी एक कप गरम पाण्यामध्ये ४-५ चमचे कांद्याचा रस मिसळा. या पाण्याने गुळण्या करा, दिवसातून दोनदा कांद्याच्या रसाच्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळेल.

- तुळशीच्या चहाने देखील टॉन्सिल्समध्ये आराम मिळू शकतो. तुळशीतील अँटीवायरल, अँटीसेप्टिक आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे सूज कमी होवून वेदना कमी होतात.

अशा प्रकारे टॉन्सिल्सची वेळीच लक्षणं ओळखून काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला लवकर बरं होण्यासाठी मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com