
Rainy season fruits harmful for diabetes control: निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी आहार घेणे गरजेचे असते. निरोगी आहाराचा विचार केला तर ताजी फळे आणि भाज्यांचा सर्वात आधी उल्लेख केला जातो. कारण, ताजी आणि हंगामी फळे तुमच्या शरीराचे पोषण करण्यासाठी काम करणारी अनेक पोषक तत्वे असतात. फळे खाल्ल्याने शरीराला अँटिऑक्सिडंट्स, आहारातील फायबर, जीवनसत्त्वे मिळतात. परंतु मधुमेहींनी काही फळे खाणे टाळले पाहिजे. कारण पावसाळ्यात पुढील काही फळे खाल्यास रक्तातील साखर वाढू शकते.