

ediatrician Dr. Sanjay Janawale explains why protecting the environment is essential for safeguarding the health and future of children.
Sakal
डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
आयक्यूएअर’ या स्विस हवा गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनीने प्रसिद्ध केलेला आठवा ‘जागतिक हवा गुणवत्ता अहवाल’, नुकताच प्रकाशित झाला. प्रदूषणाचा सर्वाधिक घातक परिणाम लहान मुलांवर होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वाढत्या आधुनिकीकरणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि अनुषंगिक समस्या, हे जगाला भेडसावणारे कळीचे प्रश्न बनले आहेत. दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होत आहे. प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, वाढते औद्योगिकीकरण, वाहनांची वाढती संख्या, वातावरणातील उष्णता शोषक वायूच्या प्रमाणात झालेली घट ही उष्णतावाढीची काही कारणे. हवेचे प्रदूषण वाढत चालले आहे. पक्षी, प्राणी व वनस्पतीच्या विविध जाती कमी होत आहेत. सर्वत्र भीषण पाणीटंचाई आहे.