Type 2 Diabetes : टाइप 2 मधुमेहासाठी कारणीभूत घटक? कोणते उपाय कराल, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Type 2 Diabetes

टाईप 2 मधुमेहाच्या जोखीममध्ये कोणते घटक आहेत ते आपण आज जाणून घेऊया..

Diabetes : टाइप 2 मधुमेहासाठी कारणीभूत घटक? कोणते उपाय कराल, जाणून घ्या

मधुमेह हा धोकादायक आणि कधीकधी प्राणघातक आजार बनू शकतो. वैद्यकीय माहितीनुसार याचे अनेक प्रकार आहेत. आज आपण टाइप २ या मधुमेहाविषयी जाणून घेणार आहोत. अनेकांना आपल्याला मधुमेह आहे हे माहिती नसेत आणि मग ते डायबिटीसचे शिकार होतात. (Type 2 Diabetes)

मधुमेहामुळे तुमचे शरीर इन्सुलिन तयार करणे थांबवते आणि जर इन्सुलिन तयार होत असेल तर तुमचे शरीर ते इन्सुलिन वापरण्यास सक्षम नाही. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. विशेषतः प्रौढांमध्ये ही समस्या अधिक आहे. टाईप 2 मधुमेहाच्या जोखीममध्ये कोणते घटक आहेत ते आपण आज जाणून घेऊया.. त्याबद्दल जर तुम्ही वेळीच जागरूक झाला तर कदाचित हा टाइप 2 मधुमेह टाळू शकता.

हेही वाचा: Tourist : झणझणीत ठसक्याची चव चाखण्यासाठी एकदा कोल्हापूरला भेट द्या..

WebMD.com च्या मते, जर तुमचे वजन वाढत असेल तर तुम्हाला त्याचा धोका होऊ शकतो. अनियंत्रित वजन वाढणे म्हणजे टाइप २ मधुमेहाला आमंत्रण देणे होय. या आजारासाठी अनुवांशिक पार्श्वभूमिही आहे. जर तुमचे पूर्वज मधुमेहाचे बळी असतील, तर तुम्हीही टाइप २ मधुमेहाचा बळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणेदरम्यान तुम्हाला मधुमेह असल्यास भविष्यात टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता असते. जर तुम्ही नियमित व्यायाम केला नाही तर तुम्ही टाइप 2 मधुमेहाचा बळी होऊ शकता.

टाइप 2 मधुमेह टाळण्याचे मार्ग

सर्वप्रथम तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची गरज आहे. नियमितपणे योगा आणि व्यायाम करा आणि आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. तुमच्या वजनावाढी किंवा घटबाबत नेहमी जागरूक राहा, जर तुमचे वजन वाढत असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःची काळजी घ्यावी.

हेही वाचा: कमी पाणी पित असाल तर सावधान! आजारांना निमंत्रण देताय...

Web Title: Type 2 Diabetes Which Was The Risk Factor Preventive Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..