Tourist : झणझणीत ठसक्याची चव चाखण्यासाठी एकदा कोल्हापूरला भेट द्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapuri food

Tourist : झणझणीत ठसक्याची चव चाखण्यासाठी एकदा कोल्हापूरला भेट द्या..

भावा हे कोल्हापूर हाय, इथं कशाची बी कमी न्हाई. पश्चिम महाराष्ट्रातील एक सदन जिल्हा म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरकरांची प्रत्येक गोष्ट विशिष्टच आहे. इथली भाषा, शिव्या, पर्यटन स्थळ आणि खाद्य पदार्थ. एकदा कोल्हापूरात आलं म्हटलं की, कोल्हापुरी भेळ, वडापाव, तांबडा-पांढरा रस्सा, कटवडा आणि मिसळीवर ताव मारल्याशिवाय राहणार नाही. झणझणीत ठसक्याची चव चाखायची असेल तर एकदा कोल्हापुरात यायला लागतंय. चला आज जाणून घेऊयात कोल्हापुरातील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ... (kolhapuri food)

  • महाराष्ट्रातला वडापाव हा पदार्थही जगभर प्रसिद्ध आहे. याशिवाय मिसळ पावलासुद्धा पसंती असतेय असं म्हटलं जातं की प्रत्येक दुसऱ्या मराठी व्यक्तीला मिसळ पाव खायला आवडतं.

  • कोल्हापूरची झणझणीत अशा मिसळपावची चव जिभेवर रेंगाळल्याशिवाय राहणार नाही.

  • कोल्हापुरात खायचं काय असा प्रश्न असेल तर पहिलं उत्तर येईल ते म्हणजे तांबडा पांढरा रस्सा. कोल्हापुरात येऊन तांबडा-पांढरा रस्सा ट्राय करायलाच हवा.

  • कोल्हापुरात कटवडासुद्धा फेमस आहे. स्थानिक लोक मिसळपाव नंतर कटवडा खाण्याला जास्त पसंती देतात. कटवड्याची टेस्टही तुम्ही घेऊ शकता.

  • कोल्हापूरात खायच्या बऱ्याच गोष्टी फेमस आहेत. त्यात स्ट्रिट फूडमध्ये भेळ जास्त प्रसिद्ध आहे. केशवराव नाट्यगृहाशेजारी असणाऱ्या खाऊ गल्लीत अस्सल कोल्हापुरच्या चवीचा आनंद लुटता येतो.

जगात भारी कोल्हापूर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. यात सगळ्यात जास्त चर्चा होते ती कोल्हापुरी चपलांची. इतिहासातही कोल्हापूरचं वेगळं असं स्थान आहे. कोल्हापूरात महालक्ष्मी मंदिर, टाऊन हॉल, न्यू पॅलेस, छत्रपती शाहू म्युझियम, रंकाळा, पन्हाळा किल्ला, जोतिबा मंदिर इत्यादी पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत.

कोल्हापुरी गुळाचा गोडवा, कोल्हापुरी फेटा या गोष्टीसोबतच गुळाच्या गोड मधाळ चवी सारखी माणुसकीची ‘कस काय पावण, बर हायसा न्हव’ अशी प्रेमळ सादही पर्यटकांच्या स्वागताला तयार आहे.