Bariatric Surgery
sakal
रमेश, वय ४२ वर्षे, ऑफिसमध्ये काम करणारा. अनेक वर्षे त्याचे वजन वाढत गेले आणि शेवटी ११५ किलोवर पोहोचले. त्याचा बीएमआय (BMI) ३८ होता. वजनाबरोबरच त्रास वाढू लागला. गेल्या मागील ७ वर्षांपासून टाइप २ मधुमेह, रक्तदाब, झोपेत श्वास अडखळणे (स्लीप ॲपनिया) यांचा त्रास वाढवा.
रमेशने आहार कमी करणे, रोज चालणे, व्यायामशाळा असे अनेक प्रयत्न केले; वजन काही कमी झाले नाही. मधुमेहही नियंत्रणात नव्हता. तीन गोळ्या + रोज इन्सुलिन असूनही त्याचा HbA1c (सरासरी साखर) ९ टक्के होता. ऊर्जा कमी झाली, आत्मविश्वास ढासळला.