आरोग्य‘चेतना’: मज्जातंतूवरील दाबामुळे तयार होणारा ‘कन्फ्लिक्ट’

ट्रायजेमिनल न्युराल्जियामागील ‘न्युरोव्हॅस्कुलर कॉन्फ्लिक्ट’चे जैविक सत्य, एमव्हीडी शस्त्रक्रियेतील ९९ टक्क्यांपर्यंतच्या यशदरातून उलगडलेले अनुभवाधिष्ठित विश्लेषण
आरोग्य ‘चेतना’: चेहऱ्यावरील तीव्र वेदना हे केवळ लक्षण नाही, तर मज्जातंतूवरील दाबाचा 'कॉन्फ्लिक्ट'! डॉ. जयदेव पंचवाघ यांनी उलगडले 'ट्रायजेमिनल न्युराल्जिया'चे सत्य

आरोग्य ‘चेतना’: चेहऱ्यावरील तीव्र वेदना हे केवळ लक्षण नाही, तर मज्जातंतूवरील दाबाचा 'कॉन्फ्लिक्ट'! डॉ. जयदेव पंचवाघ यांनी उलगडले 'ट्रायजेमिनल न्युराल्जिया'चे सत्य

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ , मेंदू आणि स्पाइन सर्जन

​गेल्या २१ वर्षांत ‘एमव्हीडी सेंटर’मध्ये काम करताना मी ‘ट्रायजेमिनल न्युराल्जिया’ (Trigeminal Neuralgia) या आजाराने त्रस्त असलेल्या ३,००० पेक्षा जास्त रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. मी त्यांच्या वेदना केवळ वैद्यकीय फाइलवरची नोंद म्हणून वाचल्या नाहीत, तर त्या मनापासून ऐकल्या आहेत. मी त्यांच्या एमआरआय फिल्म्सचा अभ्यास केला आहे, त्यांच्यावर यापूर्वी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा समजून घेतल्या आहेत. १८०० पेक्षा जास्त शस्त्रक्रियांदरम्यान, मी सूक्ष्मदर्शकाखाली त्या मज्जातंतूचा तो अत्यंत नाजूक आणि संवेदनशील भाग जवळून पाहिला आहे, जिथे हा मज्जातंतू मेंदूला जाऊन मिळतो.​सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२६ या अठरा महिन्यांच्या कालावधीत, माझ्या टीमने तीनशे ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रिया केल्या, ज्यांचे स्वतंत्रपणे ऑडिट करण्यात आले आहे. ट्रायजेमिनल न्युराल्जिया, ग्लोसोफॅरेंजियल न्यूराल्जिया आणि हेमिफेशियल स्पाझम यांसारख्या आजारांवरील आमच्या शस्त्रक्रियांचा यशाचा दर ९८.५ ते ९९ टक्क्यांच्या दरम्यान आहे. मी हे आकडे तुम्हाला प्रभावित करण्यासाठी सांगत नाही, तर हे सिद्ध करण्यासाठी सांगत आहे की, यानंतर मी जे काही मांडणार आहे, ते माझे वैयक्तिक मत नसून ते हजारो यशस्वी उपचारांतून समोर आलेले ‘सत्य’ आहे. आजार नेमका काय आहे आणि त्याला कशाची गरज आहे, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.​ट्रायजेमिनल न्युराल्जियाचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे ‘न्युरोव्हॅस्कुलर कॉन्फ्लिक्ट’. या संकल्पनेची सुरुवात १९२० च्या दशकात डॉ. वॉल्टर डँडी यांच्या एका निरीक्षणातून झाली. शस्त्रक्रिया करत असताना त्यांच्या लक्षात आले, की एक रक्तवाहिनी - जी फुगलेली आणि वेडीवाकडी झालेली होती - ट्रायजेमिनल मज्जातंतूवर जोरात दाब देत होती. त्यामुळे ती नस दबली जाऊन पातळ झाली होती. पुढे १९७० च्या उत्तरार्धात डॉ. पीटर जेनेटा यांच्या प्रतिभेमुळे डँडी यांच्या निरीक्षणाचे रूपांतर एका शस्त्रक्रियेत झाले. ही शस्त्रक्रिया केवळ वेदना दाबत नव्हती, तर वेदनेच्या मूळ कारणाचे निवारण करत होती. सन ​२०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका महत्त्वाच्या जागतिक अभ्यासाने आता त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, जे आमची टीम गेल्या दोन दशकांपासून ऑपरेशन थिएटरमध्ये अनुभवत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com