Sleep Issues in Children
sakal
- डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
लहान मुलांच्या झोपेशी संबंधित काही मुद्दे आपण गेल्या आठवड्यात बघितले. आता इतर काही मुद्दे बघू.
वयानुसार झोपेच्या समस्या बदलतात. एका वर्षापेक्षा कमी वयाची किंवा नुकतेच चालायला लागलेली मुले झोके दिल्यानंतर अथवा पाजल्यानंतर झोपतात. किंबहुना त्यांची ती सवय बनलेली असते. तुम्ही तिथे असल्यावर ती झोपतात. त्यांना झोपण्यासाठी तुम्ही तिथे असणे आवश्यक असते. झोपल्यानंतर जागे होणे व नंतर झोपणे हे नॉर्मल आहे. कधी कधी ते मूल पुन्हा झोपण्यापूर्वी बराच वेळ रडत राहते. त्यांच्या अशा रडण्याच्या सवयीमुळे मुलांना आणि पालकांनाही नीट झोप मिळत नाही.