

Unknown Symptoms of UTI
sakal
UTI Warning Signs: सध्या हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे. थंडीच्या दिवसांत अनेकजण पाणी पिण्याचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे काही वेळा लघवी करताना जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. असा त्रास सुरू झाला की अनेकजण लगेच युरिन इन्फेक्शन (UTI) झाल्याचा अंदाज लावतात. मात्र, प्रत्येक वेळी UTI ची लक्षणे लघवी करताना जळजळ होण्यापुरतीच मर्यादित नसतात. काही वेळा शरीरात संसर्ग असूनही त्याची लक्षणे सौम्य असतात किंवा वेगळ्या स्वरूपात दिसतात. त्यामुळे सुरुवातीला अनेकांच्या हा संसर्ग लक्षात येत नाही आणि उपचारांनाही उशीर होऊ शकतो.