

Support for Muscular Dystrophy Kids
sakal
Muscular Dystrophy Treatment for Children: मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मिळ आजार असला तरी या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. त्यांच्या ‘विलपॉवर’मुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. या आजारावर लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या मुलांना मदतीचा हात देत शंभर इलेक्टिॅक व्हीलचेअर देण्याची घोषणा या वेळी करण्यात आली.