Vaginal Health | योनिमार्गातील कोरडेपणा कसा दूर कराल ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaginal Health

Vaginal Health : योनिमार्गातील कोरडेपणा कसा दूर कराल ?

मुंबई : सर्व वयोगटातील महिलांमध्ये योनिमार्गात कोरडेपणा दिसून येतो. रजोनिवृत्तीदरम्यान इस्ट्रोजेन पातळीमुळे योनीमार्गावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. तणाव, चिंता, रक्तप्रवाह कमी होणे आणि निर्जलीकरण हे काही घटक आहेत ज्यामुळे योनीमार्गाचे वंगण कमी होऊ शकते.

योनिमार्गातील कोरडेपणा टाळण्यासाठी आणि वंगण वाढविण्यासाठी पोषक आहाराची गरज आहे. स्त्रियांना योनिमार्गाच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल माहीत असणे आवश्यक आहे. योनीमार्गाची काळजी कशी घ्यावी, तेथील कोरडेपणा कसा कमी करावा याबद्दल सांगत आहेत मदरहुड हॉस्पीटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रीतिका शेट्टी.  हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Physical Relation : शारीरिक संबंध सुरू असताना बेडवर चुकूनही करू नका या गोष्टी

योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे कोणत्या समस्या उद्भवतात : 

योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे जळजळ होणे तसेच इतर लक्षणांमध्ये लैंगिक संबंधातील रस कमी होणे, वेदनादायक संभोग, योनीमार्गाला खाज सुटणे, मूत्रमार्गातील संक्रमण (युटीआय) यांचा समावेश आहे.

योनीमार्गाच्या कोरडेपणाची कारणे : कमी इस्ट्रोजेन पातळी, धूम्रपान, रासायनिक उत्पादनांचा वापर, अतिप्रमाणातील शारीरिक क्रियाकलाप, शस्त्रक्रिया, विशिष्ट औषधे, तणाव आणि डचिंग यामुळे देखील कोरडेपणा निर्माण होऊ शकतो.

योनीमार्गाच्या कोरडेपणाचे व्यवस्थापन कसे कराल ?

वेळीच उपचार न केल्यास तसेच योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे योनीच्या ऊतींमध्ये फोड किंवा तेथील त्वचा फाटण्याचा धोका वाढतो.

हेही वाचा: Physical Relation : शरीराच्या या अवयवाजवळ फोन ठेवल्यास लैंगिक क्षमता होईल कमी

योनिमार्गाच्या कोरडेपणावर अशा प्रकारे करा उपचार : 

डॉक्टरांच्या सल्ल्याने जे ओव्हर-द-काउंटर वंगण किंवा मॉइश्चरायझर्सचा वापर करण्यास सांगितला जाईल त्यामुळे योनीच्या भागातील कोरडेपणा आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी मदत होईल. तुम्हाला गोळी, क्रिम किंवा रिंगच्या स्वरूपातील इस्ट्रोजेन थेरपीची देखील शिफारस केली जाईल, जी इस्ट्रोजेन सोडण्यास मदत करते.

सुंतिलित आहाराचे सेवन करा

व्हिटॅमिन डी : सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून ओळखला जातो. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि विविध अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की ते योनीतील वंगण वाढविण्यात देखील मदत करू शकते.

एवढेच नाही तर रजोनिवृत्ती दरम्यान योनिमार्गाच्या कोरडेपणाचे व्यवस्थापन आणि योनीचे आरोग्य सुधारण्यास  ड जीवनसत्वयुक्त सप्लीमेंट मदत करू शकते.

व्हिटॅमिन ई : हे एक अँटिऑक्सिडंट आहे. संशोधनानुसार, वंगण आणि योनिमार्गाच्या कोरडेपणाचा सामना करण्यासाठी हे उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.

हायलुरोनक अॅसिड :  ग्लुकोसामाइन सल्फेट, अल्फा-लिपोइक ऍसिड आणि ए,सी आणि ई जीवनसत्त्वे यांसारख्या इतर घटकांसह योनिमार्गाचा कोरडेपणा सुधारण्यास मदत होते. अगदी हायलुरोनक ऍसिडयुक्त जेल देखील व्हिटॅमिन ई सोबत योनिमार्गाचे स्नेहन वाढवत असल्याचे दिसून आले आहे.

फिश ऑइल : फिश ऑइलमधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड रजोनिवृत्ती दरम्यान योनीतील वंगण वाढवण्यास आणि योनीमार्गाचा कोरडेपणा टाळण्यास मदत करते.

टॅग्स :women bodywomen health