
Vegan Superfoods : काही लोक विगन डाएट फॉलो करतात. विगन डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या आहारात मांस, सीफूड किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करता येत नाही. वनस्पतीआधारित खाद्यपदार्थ खाण्याकडे त्यांचा कल असतो.
या डाएटबद्दल लोकांमध्ये असा ही गैरसमज आहे की, त्यांचा आहार दैनंदिन जीवनातील प्रथिनांच्या गरजा पूर्ण करत नाही. आपल्या शरीरातील स्नायूंच्या विकासासाठी अतिशय महत्वाचे असलेले प्रथिने शरीरातील इतर अनेक महत्वाची कार्येही करतात.