

Veterinary doctors in India performed a successful surgery on dog to remove tumor.
sakal
Veterinary Success: पशुप्रेम आणि सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण देत ठाणे जिल्ह्यातील 'पॉज' या संस्थेने एका आजारी आणि वृद्ध श्वानाचे नुकतेच प्राण वाचवले आहेत. 'थॉर' असे नाव दिलेल्या या श्वानाच्या पाठीवर तब्बल सव्वादोन किलो (सुमारे २.२५ किलो) वजनाचा प्रचंड मोठा ट्यूमर (गाठ) होता. संस्थेला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका पाठवून थॉरला उपचारासाठी आणले आणि त्याच्यावर सुमारे तीन तास चाललेली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.