हेल्थ वेल्थ : पावसाळ्यात फिटनेस कसा राखायचा?

पावसाळा सुरू झाला आहे. आपल्यापैकी काहीजण घरी बसून गरम चहा आणि भजीचा आनंद घेऊ शकतात.
Fitness
FitnessSakal
Updated on

- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

पावसाळा सुरू झाला आहे. आपल्यापैकी काहीजण घरी बसून गरम चहा आणि भजीचा आनंद घेऊ शकतात, तर काहीजण आपल्या फिटनेसवर काम करून या हवामानाचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पावसात व्यायाम करण्यासाठी बाहेर जाणे कदाचित शक्य होणार नाही.

पावसात न भिजता तंदुरुस्तीची पातळी राखण्यासाठी इतर काही मार्ग आहेत का? व्यायाम करणे आणि तंदुरुस्त राहणे याचा अर्थ नेहमी उघड्यावर जाणे आणि कठोर प्रशिक्षण घेणे असा होत नाही. तुम्ही घराबाहेर असताना जेवढे प्रयत्न करता, तेवढेच प्रयत्न तंदुरुस्त राहण्यासाठी घरामध्येही केले जाऊ शकतात.

तंदुरुस्त राहण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे चालणे किंवा धावणे. आता, तुमच्याकडे ट्रेडमिल किंवा जिमची सदस्यता असल्याशिवाय, चालणे किंवा धावणे हा सहसा बाहेर केल्या जाणाऱ्या व्यायामामध्ये मोडतो असा समज असतो परंतु तसे नाहीये. तुमच्याकडे ट्रेडमिल किंवा जिमची सदस्यता नसली तरीही, तुम्ही नेहमी स्पॉट वॉक किंवा स्पॉट जॉग करू शकता.

तुम्ही बाहेर फिरायला किंवा धावायला जाण्यापूर्वी तयार होता म्हणजे तुमचे धावायला जायचे कपडे घालणे, अगदी तुमच्या शूज आणि सॉक्सपर्यंत ते सर्व करा. बदल एवढाच आहे की तुम्ही बाहेर जाणार नाही, तर फक्त एकाच ठिकाणी राहून धावणार आहात. फक्त तुमचे पाय आणि हात हलतात, तुम्ही कुठेही जात नाही.

तुमच्या इमारतीतील जिना विसरू नका! ते फक्त लिफ्ट बंद असताना वापरण्यासाठी नाही. पावसाळ्यात तुमचे आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी या पायऱ्या प्रभावी आहेत. तुम्ही पायऱ्या चढत असताना अधिक प्रयत्न करावे लागतात. पावसात फिरायला जाण्यापेक्षा इमारतीच्या पायऱ्यांचा वापर करून जास्त कॅलरी किंवा ऊर्जा बर्न करू शकता. पायऱ्या चढण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ते तुमचे स्नायू तयार करण्यास मदत करते.

पायऱ्यांवरून खाली येण्याचा पूर्णपणे वेगळा परिणाम होतो. अर्थातच पायऱ्या उतरणे सोपे आहे कारण त्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागते. परंतु हे सोपे आहे कारण तुमचे शरीर गुरुत्वाकर्षण ज्या दिशेने कार्य करत आहे आणि त्याच दिशेने जात आहे. एकंदरीत, कसरत करणे हे स्थान किंवा हवामानाशी संबंधित नाही. हे तुम्ही कुठेही आहात यापेक्षा तुम्ही किती प्रयत्न करता त्यावर अवलंबून आहे.

पाऊस आला म्हणजे त्याबरोबर ठिकठिकाणी साचणारी पाण्याची डबकी देखील आली आपण कोणत्याही परिस्थितीत त्या डबक्यांमध्ये जाणे टाळले पाहिजे. वाहतुकीच्या प्रवाहाविरुद्ध धावणे किंवा चालणे टाळावे. मुसळधार पावसामुळे आपल्याला अंधूक दिसते.

एखादे वाहन वेगाने जात असल्यास, रस्ता ओला असल्यामुळे लगेच थांबणे जवळजवळ अशक्य आहे. तथापि, ट्रॅफिकच्या विरुद्ध धावणे तुम्हाला तुमच्या पुढे काय आहे याचे स्पष्ट दृश्य देते आणि तुम्ही कोणतीही दुर्घटना टाळू शकता. वर्षभर हे भान पाळले पाहिजे. तुम्हाला परिचित असलेल्या मार्गावर धावणे हा योग्य उपाय आहे. असे करण्याचा फायदा असा आहे की तुमच्या डोक्यात रस्त्याचा नकाशा तयार असेल.

तुमचे कपडे आणि पोशाख तुम्हाला सुरक्षितरीत्या धावण्यात मदत करतात. पावसाळ्यात धावताना आणि चालताना सुती कपडे घालणे टाळावे. याचे कारण कापसाचे पाणी शोषण्याचे प्रमाण जास्त आहे. कॉटनचा टी-शर्ट फक्त पाण्यात भिजतो आणि टी-शर्ट जड होतो, ज्याचा अर्थ धावताना तुम्हाला त्रास होईल आणि तुमच्या शरीरावर जास्त वजन असेल. पावसाळ्यासाठी सिंथेटिक जर्सी हा सर्वोत्तम पर्याय असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.