कल्पना करा. रमेश, वय ५२ वर्षे. ते आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहेत. धूम्रपान सोडले, कोलेस्टेरॉलची औषधे वेळेवर घेतात, आणि त्यांच्या रिपोर्ट्समध्ये ‘वाईट कोलेस्टेरॉल’ (LDL) नियंत्रित दाखवले जाते. तरीही एका सकाळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो. कुटुंबीय आश्चर्यचकित होतात, ‘पण रिपोर्ट्स तर नॉर्मल होते!’
हे प्रसंग दुर्मीळ नाहीत. डॉक्टर याला म्हणतात, ‘रेसिड्युअल कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क’ – म्हणजे रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल इत्यादी पारंपरिक घटक नियंत्रणात असूनही जो उरलेला हृदयविकाराचा धोका कायम राहतो.
या लपलेल्या धोक्याचे एक मोठे कारण म्हणजे – व्हिसेरल चरबी (Visceral Fat).