या तीन गोष्टी करा आणि कर्करोग टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cancer

या तीन गोष्टी करा आणि कर्करोग टाळा

मुंबई : कर्करोग हा एक गंभीर आजार असून त्यावर वेळीच उपचार न झाल्यास मृत्यू ओढवू शकतो. कर्करोग हा अचानक होणारा आजार नाही. तो हळूहळू शरीराला विळखा घालत जातो आणि कमकुवत करतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सदोष जीवनशैली यासाठी कारणीभूत ठरते.

एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, ड जीवनसत्त्वाची उच्च मात्रा घेणे, घरात सोप्पा व्यायाम करणे या माध्यमातून ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुदृढ व्यक्तींमध्ये कर्करोगाची जोखीम ६१ टक्क्यांपर्यंत कमी होते.

ड जीवनसत्त्व कर्करोग पेशींची वाढ रोखते. ओमेगा - ३ मुळे सामान्य पेशींचे कर्करोग पेशींमध्ये रुपांतर होणे थांबते. व्यायामामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

बिशॉफ-फेरारी यांनी ७० वर्षांवरील रुग्णांमध्ये ड जीवनसत्त्व, ओमेगा - ३ आणि घरगुती व्यायाम यांच्या एकत्रित परिणामाचे परीक्षण केले. स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि पुर्तगालमध्ये तीन वर्षे करण्यात आलेल्या या परीक्षणात २ हजार १५७ स्वयंसेवक सहभागी झाले होते.

अभ्यासातील निष्कर्षानुसार सर्व ३ उपचार तीव्र स्वरुपाच्या कर्करोगाविरोधात लाभदायी ठरले. प्रत्येक उपचाराचा एक छोटा वैयक्तिक लाभ होताच; पण अभ्यासकांनी केलेल्या परीक्षणानुसार तिन्ही उपचारांचा एकत्रित परिणाम म्हणून कर्करोगाची जोखीम ६१ टक्क्यांपर्यंत कमी झाली.

स्वित्झर्लंडचे डॉक्टर हेइक बिशॉफ-फेरारी यांच्या म्हणण्यानुसार कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी धूम्रपान टाळावे. तसेच उन्हापासून संरक्षण करावे.

टॅग्स :Cancervitamin d